Dhule Corporation News : धुळे मनपा जिल्हाधिकारी, सीईओ हवे प्रशासक; राष्ट्रवादीची मागणी

Dhule News : भाजपतर्फे मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार, अनियमितता झालेली असल्याचा देखील आरोप यावेळी निवेदनकर्त्यांतर्फे लावण्यात आला आहे
Dhule Corporation News
Dhule Corporation NewsSaam tv
Published On

धुळे : धुळे महापालिकेत असलेल्या विद्यमान पदाधिकारी, नगरसेवकांचा कार्यकाळ संपण्यावर आला आहे. (Dhule) यामुळे येथे प्रशासक बसणार असून मनपा प्रशासक पदी जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती कराण्याची मागणी राष्ट्रवादी (NCP) शरद पवार गटातर्फे करण्यात आली. (Maharashtra News)

Dhule Corporation News
Jalgaon Corona Update: जळगाव जिल्ह्यात जेएन- १ चे दोन रुग्ण; आरोग्य यंत्रणा अलर्ट

धुळे मनपाच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूका वेळेवर होऊ शकत नसल्यामुळे मनपावर शासकीय प्रशासक नेमणे क्रमप्राप्त असून, गेली पाच वर्षे धुळे मनपात (Dhule Corporation) भाजपच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट कारभार, (BJP) गुंडगिरी माजलेली असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लावण्यात आला आहे. भाजपतर्फे मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार, अनियमितता झालेली असल्याचा देखील आरोप यावेळी निवेदनकर्त्यांतर्फे लावण्यात आला आहे, 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhule Corporation News
Buldhana ACB : सहा महिन्यात लाचखोरीच्या १२ कारवाई; बुलढाणा जिल्ह्यात एसीबी पथकाची कारवाई

प्रशासनाला दिले निवेदन 
धुळे महानगरपालिकेवरील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ ३० डिसेंबर २०१३ ला संपत आहे. यामुळे धुळे महापालिकेवर जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नियुक्त करा,असे निवेदन राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे जिल्हा प्रशासनास देण्यात आले आहे. धुळे महानगरपालिकेचा कारभार चुकीच्या हाती न जाऊ देता, यासाठी जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेच प्रशासक म्हणून जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी मागणी यावेळी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com