Dhule News Saam tv
ऍग्रो वन

Dhule News: शेतात काढून ठेवलेला कापूस चोरी; भाव नसल्‍याने केली आहे साठवणूक

शेतात काढून ठेवलेला कापूस चोरी; भाव नसल्‍याने केली आहे साठवणूक

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून काढून साठवणूक करून ठेवलेला कापूस चोरट्यांकडून चोरी केला जात असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे अगोदरच अडचणीत असलेला बळीराजा संकटात सापडला आहे. (Maharashtra News)

धुळे जिल्ह्यातील साक्री व शिंदखेडा (Shindkheda) या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तर धुळे (Dhule) तालुक्यातील नगाव येथे देखील शेतकऱ्याने आपल्या शेतात काढून साठवून ठेवलेला दहा ते अकरा क्विंटल कापूस (Cotton) चोरट्यांनी चोरून पोबारा केला आहे. अवकाळी पाऊस त्याचबरोबर हवामान बदलाचा वेळोवेळी फटका शेतकऱ्यांना बसत असताना या सर्व परिस्थितीवर मात करून घेतलेले कपाशी पीक योग्य भाव मिळण्याच्या आशेने शेतकऱ्यांतर्फे साठवून ठेवले आहे.

शेतकरी चिंतेत

कापूस पिकावर चोरट्यांची वक्रदृष्टी पडल्याने शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास चोरट्यांकडून चोरी करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या शेतामधून चोरी जात असलेला शेतीमाल लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने चोरट्यांच्या मुसक्या आवळून परत करावा; अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे. तसेच या चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त देखील करावा अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tea : नेहमीचा चहा करताना घाला या ३ गोष्टी फक्कड होईल चहा पोटही होईल कमी

रील्ससाठी छतावर चढली महिला अन् पाय घसरून पडली; धक्कादायक घटना मोबाईलमध्ये कैद

Karjat Station Accident : पती दिसला नाही म्हणून महिलेने धावत्या ट्रेनमधून मारली उडी; रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

Rautwadi Waterfall : पावसाळ्यात पर्यटकांना खुणावतोय 'राऊतवाडी धबधबा', निसर्ग सौंदर्यात हरवून जाल

Shocking: संभाजीनगरच्या बालगृहातून ९ मुली का पळाल्या? धक्कादायक कारण आलं समोर; केंद्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल

SCROLL FOR NEXT