Cotton
Cotton 
ऍग्रो वन

कापसाला भाव पण..शेतकरी हतबल; करताय कपाशी नष्‍ट

साम टिव्ही ब्युरो

कापडणे (धुळे) : पावसाळ्याचे महत्त्वपूर्ण तीन महिने चारच पावसांत निघून गेले. शेवटच्या महिन्यात अतिवृष्टी आणि सातत्यपूर्ण पावसाने खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले. पावसाळा संपता संपता कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीची शेती सोडून देण्याची वेळ आली आहे. बहुतांश शेतकऱ्‍यांनी लाल्या आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीच्या शेतीत जनावरे सोडली आहेत. रोटाव्हेटर फिरवून रब्बीची तयारी सुरू केली आहे. (dhule-news-Prices-of-cotton-but-farmers-are-helpless-Do-not-waste-cotton)

पावसाअभावी कडधान्याचा हंगाम आलाच नाही. शेतकऱ्‍यांच्या कपाशीवर उरलेल्या आशाही धुळीस मिळाल्या आहेत. कपशीवर मर, बोंडअळी, करपा आणि लाल्याचा प्रादुर्भाव आदी रोगांचा हल्ला एकाच वेळी पाहायला मिळत आहे. शेतकरी पुरते हतबल झाले आहेत. धुळे तालुक्यात यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने पेरण्या लांबल्या. त्यातही बहुतांश शेतकऱ्‍यांनी दुबार पेरण्या केल्या आहेत. तालुक्यात मूग, उडीद, चवळी या कडधान्याचा बऱ्‍यापैकी पेरा होता. दुबार पेरणी अन् त्यानंतर महिनाभर लांबलेल्या पावसाने कडधान्य पिकांची वाढच झाली नाही. हा हंगाम पूर्णपणे हातचा गेला. घरापुरतेही कडधान्य हाती लागलेले नाही. नगदी पीक आणि सुगीपूर्व बऱ्‍यापैकी हाती लागल्यास हाती पैसा येतो. मात्र हा हंगाम गेल्याने शेतकऱ्‍यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

कपाशीचे व्हावेत पंचनामे

शेतकऱ्‍यांची कापूस आणि मक्यावर आशा आहे. दोन्ही पिकांची पावसाअभावी पुरेशी वाढ झालेली नाही. कपाशीवर मर, करपा, बोंडअळी आणि लाल्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. बऱ्‍याचशा शेतांमध्ये कापसाची स्थिती दयनीय झाली आहे. शेतकऱ्‍यांनी मोठा खर्च करूनही हाती काहीही लागणार नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होऊ लागली आहे.

कापसाला भाव, पण..

कापसाचा भाव प्रतिक्विंटल आठ हजारांवर पोचला आहे. प्रथमच एवढ्या भावामुळे शेतकऱ्‍यांचे डोळे विस्फारले आहेत. पण लाल्याने कापसाचा पांढरा रंग फिका केला आहे. शेतकऱ्‍यांच्या पदरी निराशाच आहे.

- आत्माराम पाटील, माजी जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : कोडेंश्वर येथील वीटभट्टीवरील कारवाईनंतर मविआ आक्रमक

Skincare Tips: चमकदार त्वचेसाठी 'हे' टिप्स करा फॉलो

SRH vs GT: हैदराबाद - गुजरात सामना रद्द होणार! समोर आली मोठी अपडेट

Rajgurunagar Rain News | पुण्यातल्या राजगुरूनगरमध्ये जोरदार पाऊस, आंब्याला फटका

Ghatkopar Hoarding Collapse: कारमध्ये पेट्रोल भरायला गेले अन् जीव गमावून बसले; मुंबईतील दाम्पत्याची हृदयद्रावक कहाणी

SCROLL FOR NEXT