शेतकरी कर्जमुक्त 
ऍग्रो वन

धुळे जिल्ह्यात ४५ हजारांवर शेतकरी कर्जमुक्त

धुळे जिल्ह्यात ४५ हजारांवर शेतकरी कर्जमुक्त

साम टिव्ही ब्युरो

धुळे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील ४५ हजार ७४ शेतकऱ्यांना ३४२ कोटी ७२ लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अभिजित देशपांडे यांनी दिली. (dhule-news-Over-45-thousand-farmers-in-Dhule-district-are-debt-free)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी शासनाने सत्तास्थापनेनंतर शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ जाहीर केली. यात ज्या शेतकऱ्यांकडे एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जखात्यात अल्पमुदत पीककर्जाची ३० सप्टेंबर २०१९ ला मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम होती अशा अल्प, अत्यल्पभूधारक या प्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्जखात्यात दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याची घोषणा केली होती.

ऑनलाईन राबविली योजना

पालकमंत्री तथा महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सनियंत्रण समितीची स्थापना झाली. राज्य शासन, योजनेचे मध्यवर्ती पथक, पुणेस्थित सहकार आयुक्त व निबंधकांच्या मार्गदर्शनानुसार महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ऑनलाइन पद्धतीने राबविली. धुळे, साक्री, शिरपूर व शिंदखेडा तालुका मिळून ४९ हजार ८०१ कर्जखाती अपलोड केली. आधार प्रमाणीकरण झालेल्या खात्यांची संख्या ४५ हजार ६०२ होती. आधार प्रमाणीकरणासाठी संबंधित खातेदारांना वेळोवेळी संधी दिली. तक्रार असलेल्या खात्यांची जिल्हास्तरीय समिती व तहसीलदारांच्या माध्यमातून निवारण केले. जिल्ह्यात अद्यापही ५८२ खातेदारांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे, असे जिल्हा उपनिबंधक देशपांडे यांनी सांगितले.

तालुकानिहाय लाभ

जिल्ह्यातील तालुकानिहाय कर्जमुक्त शेतकऱ्यांची संख्या व एकूण रक्कम (अनुक्रमे तालुका, लाभ रक्कम वितरित झालेली शेतकऱ्यांची खाती, एकूण रक्कम कोटींमध्ये) : धुळे- १६३७१, ११९.२२, साक्री- १११२१, ८७.३८, शिरपूर- ६२४६, ५१.१४, शिंदखेडा- ११३३६, ८४.९८.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips Of Home Cleaning: रविवारी घराची साफ- सफाई करताय? लादी पुसण्याची योग्य वेळ कोणती?

Kande Pohe: कांदेपोहे कधी चिकट तर कधी वातड होतात? मग या 8 टिप्स करा फॉलो

Maharashtra Live News Update: पावसामुळे मध्यरेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने

Diva-Chiplun Memu Train : कोकणवासीयांसाठी आनंदवार्ता! दिवा-चिपळूण मेमोला कायमस्वरूपी हिरवा कंदील, जाणून घ्या वेळापत्रक

अग्रीमेंट रिलेशनशिपच्या नावे लव्ह जिहाद? लग्नानंतर कुटुंबीयांकडून मुलीचा शोध सुरु|VIDEO

SCROLL FOR NEXT