Onion Price Saam tv
ऍग्रो वन

Onion Price News: अपेक्षेप्रमाणे भाव नसल्याने शेतकऱ्यांकडून कांदा साठवणूक

Dhule Onion News: रब्बी हंगामातील हा कांदा खराब होत नसल्याने घरात साठवणूक करण्यासाठी देखील घेतला जात असतो.

भूषण अहिरे

धुळे : कांदा निर्यात बंदी केल्यानंतर ३१ मार्चला उठविण्यात येणार होती. मात्र निर्यात बंदी कायम असल्याने कांद्याला (Onion) अजून देखील चांगला भाव मिळत नाही. यामुळे बहुतांश शेतकरी हे कांदा काढणी (Dhule) केल्यानंतर मार्केटमध्ये विक्रीसाठी न नेता त्याची साठवणूक करण्यावर भर देत आहेत. (Breaking marathi News)

धुळे तालुक्यात रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा काढणीचे काम वेगाने सुरू आहे. रब्बी हंगामातील हा कांदा खराब होत नसल्याने घरात साठवणूक करण्यासाठी देखील घेतला जात असतो. मात्र सरकारच्या निर्यात बंदी बाबतच्या चुकीच्या धोरणामुळे सध्या बाजारात कांद्याला समाधानकारक भाव नसल्यामुळे आगामी काळात कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल; या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी (Farmer) कांदा साठवणूक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे,

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१० ते १५ रुपये मिळतोय दर 
सध्या ऐन विक्रीच्या वेळी कांद्याचे बाजारभाव पडल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. दुसरीकडे खत औषधांच्या किमती प्रचंड वाढल्या असून सध्या बाजारात उन्हाळी नवीन कांद्याला १० ते १५ रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल कांदा साठवणूक करण्याकडे असल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संघटीत गुन्हा निष्पन्न, बागूल टोळीवर मोक्का लावण्याच्या हालचाली सुरू

Pik Vima Yojana: शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! या तारखेपर्यंत फळपीक विमा योजनेसाठी करु शकता अर्ज; वाचा सविस्तर

APMC मार्केटमधून ड्रायफ्रूट्स खरेदी करताय तर थांबा, भेसळयुक्त काजू- बदाम अन् मनुक्यांची विक्री; धक्कादायक VIDEO समोर

Box Office Collection: 'कांतारा: चॅप्टर १' ची बॉक्स ऑफिसवर तुफान क्रेझ; ५०० कोटींच्या क्लबमध्ये लवकरच करणार एन्ट्री

Pune News : पुणेकरांनो सावधान! भेसळयुक्त खवा-मावा, तूप अन् तेलाची विक्री, २ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT