Dhule News Saam tv
ऍग्रो वन

Dhule News : अवकाळीने पिकांचे नुकसान; कर्जफेडीच्या चिंतेतून शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

Rajesh Sonwane

दोंडाईचा (धुळे) : पावसाअभावी, अवकाळी पावसामुळे पिकांची स्थिती चांगली नसल्याने तसेच शेतात केलेल्या (Dhule) कूपनलिकेला चांगले पाणी लागले नसल्याने हताश झालेले शेतकरी (Farmer) हेमराज भटेसिंग गिरासे (वय ४७) यांनी टोकाचे पाऊल उचलले. (Live Marathi News)

पथारे (ता. शिंदखेडा) येथील शेतकरी हेमराज भटेसिंग गिरासे यांनी गुरुवारी (ता.३०) सकाळी साडेअकराच्या सुमारास निमगूळ रस्त्यावरील खळ्यात विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केली. याची माहिती त्यांचे लहान भाऊ विरपाल गिरासे (खर्दे ता. शिंदखेडा) यांना मिळाली. त्यांनी नातेवाइकांसह ग्रामस्थांच्या मदतीने खासगी वाहनातून दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात भटेसिंग गिरासे यांना दाखल केले. डॉ. तेजस जैन यांनी तपासून दुपारी साडेबाराला मृत घोषित केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हेमराज गिरासे यांनी शेतीसाठी विविध बँकांतून कर्ज घेतले होते. त्यांनी कर्जबाजारीपणातून आत्महत्या केली असल्याची फिर्याद वीरपाल गिरासे यांनी दोंडाईचा पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई गावित तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांचा राडा, दोन गटांत तुंबळ हाणामारी, पाहा

PM Kisan Samman Nidhi : नवरात्रीनिमित्त PM मोदींकडून शेतकऱ्यांसाठी मोठं गिफ्ट; किसान सम्मान निधीचा १८ वा हप्ता खात्यात जमा

Bombay Vada pav : मुंबईच्या वडापावचं टोपण नाव माहितीये का?

PM Modi : पंतप्रधान मोदींची विरोधकांवर कठोर शब्दांत टीका; पाहा Video

Marathi News Live Updates : सांगलीमध्ये ४० ते ५० जणांना भगरीच्या तांदळातून विषबाधा

SCROLL FOR NEXT