Shirpur Police Saam tv
ऍग्रो वन

Shirpur Police : शिरपूर तालुक्यात बनावट खतांचा कारखाना उध्वस्त; कृषी विभाग व पोलिसांची छापा टाकत कारवाई

Dhule News : शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर आता बनावट खते व बियाणे तस्करांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे.

भूषण अहिरे

धुळे : खरीप हंगाम सुरु झाला कि प्रामुख्याने बनावट बियाणांची विक्री केली जात असते. यानंतर खतांचा काळाबाजार होत असताना दिसतो. यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असते. दरम्यान शिरपूर तालुक्यात बनावट खतांचा कारखाना सुरु होता. पोलीस प्रशासन व कृषी विभागाच्या पथकाने येथे छापा टाकत कारवाई करून कारखाना उध्वस्त केला आहे. 

शेतकऱ्यांचा (Farmer) खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर आता बनावट खते व बियाणे तस्करांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. शिरपूर (Shirpur) तालुक्यातील करवंद या ठिकाणी शिरपूर पोलिसांसह कृषी विभागाच्या भरारी पथकाने बनावट खतांचा कारखाना उध्वस्त केला आहे. पोलिसांनी व कृषी विभागाच्या भरारी पथकाने एका बनावट खतांच्या कारखान्यावरती छापा टाकला असता त्या ठिकाणाहून जवळपास २० लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

विशेष म्हणजे ज्या संशयितांच्या कृपा दृष्टीने हा बनावट खतांचा कारखाना सुरू होता. त्या संशयितावर यापूर्वी देखील (Agriculture Department) बनावट खत तयार करण्याच्या संदर्भात गुन्हा दाखल होता. आता पुन्हा त्याच प्रकारे बनावट खत तयार करून त्याचे पॅकिंग करत असल्याची खात्रीदायक सूत्रांकडून पोलीस प्रशासनाला व कृषी विभागाला माहिती मिळाली होती, या माहितीच्या अनुषंगाने कृषी विभागाने व शिरपूर पोलिसांनी ही कारवाई केली असून, या कारवाईमुळे बनावट खत तयार करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Side Effects: अचानक साखर खाणं सोडणं पडेल महागात, चेहऱ्यावर दिसतील हे गंभीर परिणाम, वेळीच व्हा सावध

Sugarcane Juice: उसाचा रस पिताय? वाचा कोणत्या रूग्णांनी पिऊ नये

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी

Wedding Special Hairstyle: लग्नात साडीवर करा १० मिनिटात करा या ७ सुंदर आणि क्यूट हेअरस्टाईल

Cholesterol control tips: औषधं न घेताही कमी होईल कोलेस्ट्रॉल; फक्त दररोज फॉलो करा या टीप्स

SCROLL FOR NEXT