Lightning Strike Saam tv
ऍग्रो वन

Lightning Strike : पाऊस येणार म्हणून सोयाबीनची गंज झाकण्याची लगबग; वीज कडाडली अन् घडले भयानक

Dharashiv News : धाराशिवच्या कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा गावांमध्ये वीज पडुन युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अजय आसाराम गायकवाड असे मृत्यु झालेल्या युवकाचे नाव

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार धाराशिव जिल्ह्याच्या परिसरात पावसाचे आगमन झाले आहे. यामुळे शेतात काढणीला आलेला सोयाबीन कापून शेतात ठेवला होता. मात्र पाऊस येणार असल्याने सोयाबीन एका ठिकाणी जमा करून झाकण्याची लगबर सुरु असताना, वीज पडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. 

धाराशिवच्या (Dharashiv) कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा गावांमध्ये वीज पडुन युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अजय आसाराम गायकवाड असे मृत्यु झालेल्या युवकाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळच्या दरम्यान पावसामुळे शेतातील सोयाबीन भिजत असल्याने अजय गायकवाड यांनी सोयाबीनची गंज झाकून ठेवण्याची तयारी करत होता. याच दरम्यान वीज (Lightning Strike) पडली यातच अजय यांचा मृत्यू झाला आहे.

पीक आवरण्याची लगबग 

येत्या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे शेतकरी शेतातील कामे आवरण्याचा तयारीत आहेत. प्रामुख्याने सोयाबीन पीक आता काढणीला आले असल्याने अनेकांनी सोयाबीन कापून ठेवला आहे. तसेच लवकर लागवड केलेल्या मका देखील काढणीवर आला असून शेतकरी याच्या तयारीला लागला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : डॉलर्स एक्स्चेंजच्या आमिषाने महिलेची फसवणूक; १ लाख रुपये घेऊन पसार, एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Kiran Mane : "लै लै लै भारी वाटलं..."; किरण माने यांनी केलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं कौतुक, नव्या गाडीसोबत फोटो केला शेअर

Lord Shiva: शंकर महादेवांना 'नीलकंठ' का म्हणतात? निळ्या रंगामागचं रहस्य काय?

Pranjal Khewalkar : "ती महिला पोलिसांनी पाठवली" प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांचा खळबळजनक दावा | VIDEO

Gold Rate Today : सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ, वाचा आजचे दर काय?

SCROLL FOR NEXT