Crop Loan Saam tv
ऍग्रो वन

Crop Loan : रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वाटपात बँकेचा हात आखडता; केवळ २१ टक्के कर्ज वाटप

Dharashiv News : यंदाच्या रब्बी हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांची गैरसोय होवु नये; म्हणुन ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कर्ज घेतले नाही. त्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात कर्ज देण्यात येते

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बँकेमार्फत पीककर्ज वाटप केले जात असते. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत आणि ग्रॅनीम बँकेला कर्ज वितरित करण्याचे टार्गेट देण्यात येत असते. मात्र धाराशिव जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामासाठी कर्ज वाटप चांगली झाली नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. आतापर्यंत केवळ २१ टक्केच कर्ज वाटप करण्यात आले आहे. 

प्रत्येक शेतकऱ्याला खरीप व रब्बी हंगामात पीक लागवड करण्यापूर्वी बियाणे, खते खरेदी करण्यासाठी बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असते. त्यानुसार यंदाच्या रब्बी हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांची गैरसोय होवु नये; म्हणुन ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कर्ज घेतले नाही. त्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात कर्ज देण्यात येते. मात्र शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँका कोणत्या ना कोणत्या कारणाने कर्ज नाकारत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

जिल्हा बँकेचे शून्य टक्के वाटप 

दरम्यान धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वाटपातही सर्वच बँका मागे असल्याचे पाहण्यास मिळत आहे. जिल्ह्यातील बँकांना देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी केवळ २१ टक्के शेतकऱ्यांना वाटप झाले आहे. यामध्ये राष्ट्रीयकृत बँकानी २९ टक्के, ग्रामीण बॅंकानी ७ टक्के तर जिल्हा बॅंकेने काहीच वापट केले नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. अर्थात शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँका आपला हात आखडता घेत आहेत. 

५१ लाख ७४ हजाराचा निधी शिल्लक 

दरम्यान रब्बी हंगामासाठी धाराशिव जिल्ह्यातील ७ लाख ५६५ सभासदांना ६१ लाख ८४ हजार ६०० रुपये वाटपाचे उद्दिष्ट रब्बी हंगामासाठी देण्यात आले होते. त्यापैकी काही शेतकऱ्यांना १० लाख १० हजार ४०० रुपयांचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. अर्थात अजूनही बँकांकडे ५१ लाख ७४ हजार २०० रुपयांचे कर्ज वाटप बाकी आहे. मात्र आता बहुतांश शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील लागवड पूर्ण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

SCROLL FOR NEXT