Farmer Rasta Roko Saam tv
ऍग्रो वन

Farmer Rasta Roko : शेतकऱ्यांकडील सोयाबीन सरसकट खरेदी करा; मागणीसाठी शेतकऱ्यांचे तुळजापूरात रास्ता रोको

Dharashiv News : ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने नोंदणी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन राज्य सरकारने सरसकट खरेदी करावी, या मागणीसाठी सोयाबीन उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहे सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : सोयाबीनला हमीभाव देत शासकीय नाफेडची खरेदी सुरु करण्यात आली होती. याठिकाणी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी केला जात होता. दरम्यान यासाठी देण्यात आलेली मुदतवाढ देखील आता संपत असून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा सोयाबीन सरसकट खरेदी करण्यात यावा; या मागणीसाठी तुळजापुरात आज शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. 

धाराशिवच्या तुळजापूर शहरात सोयाबीन उत्पादक शेतकरी, महाविकास आघाडी व सामाजीक संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने नोंदणी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन राज्य सरकारने सरसकट खरेदी करावी, या मागणीसाठी सोयाबीन उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहे. सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान सर्व शेतकऱ्यांचे सरसगट सोयाबीन खरेदी करावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

२० हजार शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदीचे आव्हान
शेतकऱ्यांना आधारभूत किमतींमध्ये सोयाबीन विक्री करता, यावी यासाठी नाफेडकडुन धाराशिव जिल्ह्यात २१ हमीभाव खरेदी केंद्र कार्यान्वित केली आहेत. मात्र शासनाने दिलेली पहिली मुदत ३१ जानेवारीला संपली होती. यानंतर दिलेली ६ फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिली असली तरी हा कालावधी अपुरा पडणार आहेत. जिल्ह्यातील २० हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन दोन दिवसात खरेदी करण्याचे मोठे आव्हान खरेदी केंद्राना आहे.  

आणखी मुदतवाढ देण्याची मागणी 

दरम्यान केंद्रावर रात्र- दिवस काम सुरू आहे. तरीही शेतकऱ्यांचे संपुर्ण सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट दोन दिवसात पुर्ण होते शक्य नाही. यामुळे नोंदणी करून देखील केंद्रांवर सोयाबीन विक्री करू शकत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. यामुळे हमीभाव खरेदी केंद्राला आणखी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांतुन केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT