Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : धाराशिव जिल्ह्यातील ५४ हजार ७२७ शेतकऱ्यांच्या बँकेत पीकविमा अनुदान

Dharashiv News : २०२२ खरीप हंगामातील पिक विम्याची रक्कम मिळाली नव्हती. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास गुरूवारपासुन सुरुवात झाली

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : पिकांच्या होणाऱ्या नुकसानीला सुरक्षा कवच म्हणून पीक विमा काढण्यात आला होता. दरम्यान पिकांचे नुकसान होऊन देखील (Farmer) शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून विमा रकमेची प्रतीक्षा होती. मात्र (Dharashiv News) धाराशिव जिल्ह्यातील सहा मंडळातील सुमारे ५४ हजार ७२७ शेतकऱ्याच्या खात्यात पीक विम्याची रक्कम गुरुवारपासून जमा करण्यात येत आहे. (Breaking Marathi News)

धाराशिव जिल्ह्यातील मोहा, पाडोळी, सावरगाव, अनाळा, सलगरा, सोनारी या सहा मंडळातील ५४ हजार ७२७ शेतकऱ्यांना २०२२ खरीप हंगामातील (Crop Insurance) पिक विम्याची रक्कम मिळाली नव्हती. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास गुरूवारपासुन सुरुवात झाली असुन आगामी दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० कोटी ५० लाख रुपये जमा होणार आहेत; अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी दिली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केवायसी करण्याचे आवाहन 

पीक विम्याची रक्कम हि थेट बँक खात्यात जमा केली जात असते. अर्थात ज्याच्या नवे शेतीचा सातबारा आहे. त्याच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यास सुरवात झाली असून बँकेच्या खात्याचे केवायसी आवश्यक आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी राहीली आहे त्यांनी पुर्ण करुन घ्यावी असे आवाहन देखील कृषी विभागाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : देशातील तिसरे मोठे आयटी पार्क सोलापुरात होणार

सरकारचा मोठा निर्णय; शाळा–रुग्णालय परिसरात कुत्रे सोडणाऱ्यांना दंड

'Bigg Boss Marathi'च्या 6 व्या सीझनची घोषणा! रितेश देशमुख की महेश मांजरेकर कोण करणार होस्टिंग? 'या' नावाची तुफान चर्चा

Accident: 'ती' भेट अखेरची ठरली! मित्रांसोबत पार्टी, घराकडे जाताना काळाचा घाला; अपघातात IIM च्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Sambhaji Nagar: धक्कादायक! बनावट कागदपत्रे, सहा महिन्यापासून हॉटेलमध्ये महिलेचे वास्तव्य, पाकिस्तान कनेक्शन झाले उघड

SCROLL FOR NEXT