Climate Change Saam tv
ऍग्रो वन

Climate Change : करपा रोगामुळे मिरचीला फटका; बदलत्या हवामानामुळे रब्बी पिकांचे नुकसान

Dharashiv news : धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने नवनवीन संकटाचा सामना करताना पाहायला मिळत आहे. कधी अवकाळी गारपीट तर कधी दुष्काळ यामुळे सातत्याने संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहत आहे

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. शिवाय ढगाळ वातावरण देखील निर्माण झाले आहे. याचा फटका पिकांना बसत असून पिकांवर रोगराई पडल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान ढगाळ वातावरण आणि करपा रोग पडल्याने मिरची पिकाला फटका बसला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर रब्बी पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी सातत्याने नवनवीन संकटाचा सामना करताना पाहायला मिळत आहे. कधी अवकाळी गारपीट तर कधी दुष्काळ यामुळे सातत्याने संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहत आहे. त्यातच यंदा पाऊस चांगला झाला. मात्र महावितरणकडुन सुरळीत विजपुरवठा होत नसल्याने व दुसरीकडे ढगाळ वातावरण व करप्या रोगाचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांच्या मिरची पिक धोक्यात आले आहे. औषध फवारणी करुनही कोणताही परिणाम होत नाही. 

मिरची उत्पादनात घट होण्याची शक्यता 

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर परिसरात मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. मात्र ढगात वातावरणासह हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे मिरचीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. 

बदलत्या हवामानामुळे रब्बी पिक धोक्यात
नंदूरबार
: नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असून त्याचा परिणाम आता रब्बी हंगामातील पिकांना होताना पाहायला मिळत आहे. वाढलेला तापमानामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांना धोका निर्माण झाला असून रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, बाजरी या पिकांना बदलत्या वातावरणाचा फटका बसणार असून या पिकांचा उत्पादनात देखील घट होणार असून यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार असल्याचं दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning blood pressure: सकाळी उठल्या उठल्या बीपी वाढलेला असतो? 'ही' आहेत त्यामागची धोकादायक कारणं

Bank Holiday: खातेधारकांनो लक्ष द्या! 13 ऑगस्टला बँका बंद की सुरू? जाणून घ्या तुमच्या राज्यातील अपडेट...

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update : आंबोली-चौकुळच्या सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त खेळ

Fitness Tips: जिमला जाण्याची गरज नाही! फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी ‘या’ ७ सवयी लावा

SCROLL FOR NEXT