Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance : धाराशिव जिल्ह्यात ६ लाख ८९ हजार शेतकऱ्यांनी उतरविला पिक विमा

Dharashiv News : पावसाच्या लहरीपणामुळे शेतात लागवड केलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान होत असते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असतो. या दृष्टीने पंतप्रधान पीक विमा योजना सुरु करून पिकांना एकप्रकारे सुरक्षा कवच देण्यात आले आहे.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : खरीप हंगामासाठी सरकारने एक रुपयात पीक विमा योजना सुरु केली आहे. यात धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामात आतापर्यंत ६ लाख ८९ हजार ४०४ शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. यामध्ये जवळपास ६ लाख ५४ हजार ५९२ हेक्टर क्षेत्र हे सुरक्षित करण्यात आले आहे.

पावसाच्या लहरीपणामुळे शेतात लागवड केलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान होत असते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असतो. या दृष्टीने पंतप्रधान (crop insurance) पीक विमा योजना सुरु करून पिकांना एकप्रकारे सुरक्षा कवच देण्यात आले आहे. यंदाच्या खरीप हंगामात देखील एक रुपयात पीक विमा उयोजना सुरु करण्यात आली आहे. या करीत १५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत अनेक शेतकऱ्यांनी (Kharip Hangam) खरीप हंगामासाठी पीक विमा काढून पिकांना सुरक्षा कवच दिले आहे. 

गतवर्षीपेक्षा संख्या घटली 

दरम्यान धाराशिव जिल्ह्यात ६ लाख ८९ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. पिक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचा (Farmer) हिस्साही राज्य सरकारने उचलण्याची घोषणा केल्यानंतर मागच्या वर्षीपासून पिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या साडेसात लाखांपर्यंत पोहोचली आहे. तरीही आजपर्यंत मागच्या वर्षीचा टप्पा ही गाठता आलेला नाही. या पिक विमा हिस्सा पोटी राज्य आणि केंद्र सरकारकडून पिक विमा कंपनीला जवळपास ५७० कोटी रुपये मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT