Dharashiv News Saam tv
ऍग्रो वन

Dharashiv News : अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईची प्रतीक्षाच; धाराशिव जिल्ह्यातील २ लाख ६० हजार शेतकरी वंचित

Dharashiv News : राज्यात यंदा पावसाची संततधार सुरु होती. काही ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतातील पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : यंदा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. काही ठिकाणी तर अतिवृष्टी झाली होती. शेतांमध्ये पाण्याचे तळे साचल्याचे देखील पाहण्यास मिळाले होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा झाली होती. मात्र अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईची शेतकऱ्यांना अद्याप प्रतीक्षा लागून आहे.

राज्यात यंदा पावसाची संततधार सुरु होती. काही ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतातील पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान अनेक (Farmer) शेतकऱ्यांनी पीक विमा देखील काढलेला होता. मात्र अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाने मदत जाहीर केली होती. (Dharashiv News) मात्र हि मदत तीन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. 

मदतीसाठी मुख्य सचिवांकडे प्रस्ताव 

धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे सरकारकडे ३०८ कोटी २१ लाख रुपये थकीत आहेत. ही रक्कम सरकारने शेतकऱ्यांना वितरित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी शासनाकडे केली आहे. याबाबत धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. 

अडीच लाखांपेक्षा शेतकरी वंचित 

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख ६० हजार ६९० शेतकरी या नुकसान भरपाई पासून वंचित राहिले आहेत. ही नुकसानीची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांना देण्यात यावी; अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT