पीक विम्यासाठी लाल वादळ घेऊन किसान सभा बीडच्या दिशेने रवाना विनोद जिरे
ऍग्रो वन

पीक विम्यासाठी लाल वादळ घेऊन किसान सभा बीडच्या दिशेने रवाना

सिरसाळा ते बीड लॉंग मार्चला सुरुवात...

विनोद जिरे

बीड : शेतकऱ्यांच्या पीक विम्याची मागणी घेऊन, अखिल भारतीय किसान सभा रस्त्यावर उतरली आहे. पीक विम्यासाठी शेकडो शेतकऱ्यांसह लाल वादळ घेऊन, किसान सभेसह माकप बीडच्या दिशेने रवाना झाले आहेत. परळी तालुक्यातील सिरसाळा ते बीड या लॉंग मार्चला सुरुवात झाली आहे.

हे देखील पहा-

खरीप 2020 सह 21 चा पीक विमा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळावा, याकरिता अखिल भारतीय किसान सभेने परळी, बीड, पुणे आणि मुंबई या ठिकाणी अनेक आंदोलने करण्यात आली. शासनाने शेतकऱ्यांना वेळोवेळी विमा मिळेल, असे आश्वासन दिले आहेत. सोबतच विमा कंपनीला निर्देश देऊन देखील, 2021 संपत आले आहे.

तरी अद्याप 2020 ची विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे किसान सभा सिरसाळा ते बीड असा 80 किलोमीटरचा प्रवास करत ,चार दिवस लॉंग मार्च काढून आंदोलन करत आहेत. तर 1 तारखेला या लॉंग मोर्चाचे ठिय्या आंदोलनात रूपांतर होणार, असून जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या देण्यात येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चेसाठी CJP रवाना

Kitchen Hacks : फ्रिजमधून घाण वास येतोय ? तर चहापत्तीचा 'हा' भन्नाट उपाय करून पाहा

मोठी बातमी: NEET पेपरफुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आक्रमक! केंद्र अन् NTA वर ताशेरे; कोर्टात नेमकं काय घडलं?

Crime: मित्रासमोरच तरुणीवर सामूहिक बलात्कार, जंगलात फिरण्यासाठी गेले असता भयंकर घडलं

Mumbai Police : दादरमध्ये संतापजनक घटना! आंदोलक विद्यार्थिनीला पोलिसाकडून चुकीचा स्पर्श? व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ

SCROLL FOR NEXT