ज्ञानेश्वर कारखान्याच्या ऊस बेणे प्लॉटला शास्त्रज्ञांची भेट. साम टीव्ही
ऍग्रो वन

ऊसाचे हे वाण शेतकऱ्यांना करील समृद्ध

साम टीव्ही न्यूज .

अहमदनगर : नेवासे तालुक्यातील भेंडे येथील लोकनेते मारूतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस बेणे मळ्यात नवीन प्रयोग केला आहे. मल्टीलोकेशन ट्रायलमध्ये लागवड करून विकसित केलेल्या कोव्हिएसआय-१८१२१ वाणाच्या ऊस बेणे शेतीची पहाणी कोव्हिएसआयचे शास्रज्ञांनी केली. हे ऊस बेणे लवकरच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.CoVSI-18121 varieties of sugarcane will enrich the farmers

नवीन ऊसाच्या विभागीय चाचणी प्रयोगामध्ये कोव्हिएसआय -१८१२१ या ऊस वाणासोबतच इतर तेरा वाणाची लागवड करण्यात आली. या बेणे शेतीला चांगला प्रतिसाद मिळाला. हा वाण लवकरच शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर अनुकरणीय चाचणीसाठी उपलब्ध केला जाणार आहे, अशी माहिती व्हीएसआयचे प्रमुख शास्रज्ञ डॉ.रमेश हापसे व डॉ. जे. रेपाळे यांनी दिली.

व्हीएसआयचे शास्रज्ञ म्हणाले, कोव्हिएसआय -१८१२१ हा वाण को-८६०३२ (मादी) व कॉट ८२०१ (नर) या दोन वाणाचा संकर आहे. सर्व प्रकारच्या जमीन प्रकारात उत्तम प्रतिसाद देणारा वाण आहे. को-८६०३२ वाणापेक्षा जास्त वाढ व जाडी मिळते. त्याच प्रकारे योग्य प्रमाणात फुटवे आहेत. साखर उतारा ८६०३२ वाणापेक्षा ०.७५ ते १ टक्के जास्त मिळेल.

उत्पादन १५-२० टक्क्याने जास्त मिळण्याची अपेक्षा आहे. एक समान प्रमाणात वाढ होणारे फुटवे मिळतात, यामुळे भविष्यात या वाणाकडे को-८६०३२ वाणाचे पुढील व्हर्जिन म्हणून पाहिले जाते.

लवकरच या वाणाचे बेणे व्हीएसआयच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर कारखान्याच्या ऊस विकास विभागामार्फत वितरित केले जाणार आहे. यावेळी कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे, उपशेतकी अधिकारी सतीश डावखर, ऊस विभाग प्रमुख मंगेश नवले, कृषी विद्यालयाचे प्राचार्य सोपान मते आदी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

SCROLL FOR NEXT