cotton price dropped in parbhani  saam tv
ऍग्रो वन

Cotton Prices Drop In Parbhani : कापसाचे भाव कोसळले; परभणी जिल्ह्यातील शेतकरी हतबल

Parbhani Latest Marathi News : शेतक-यांनी महागड्या औषधांची फवारणी करत कापूस जोपासला. सुरुवातीला मिळणारा प्रतिक्विंटलचा भाव आज आठ हजार रुपयांवर आला आहे.

राजेश काटकर

Parbhani :

परभणीसह ग्रामीण भागात आज ना उद्या कापसाचा भाव वाढेल यासाठी शेतकरी बाजार समितीच्या मार्केट यार्डात होणाऱ्या लिलावाकडे आस लावून बसला आहे. मात्र, दिवसेंदिवस भाववाढ होण्याऐवजी दर कमी होत असल्याने कापूस उत्पादकांची पुरती निराशा झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपेक्षित भाववाढीने शेतकऱ्यांचा घात केला असून बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात साठवलेले पांढरे सोने काळवंडत चालल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली तेव्हा कापसाचा दर 12 हजार रुपये प्रतिक्विंटल होता.

शेतक-यांनी महागड्या औषधांची फवारणी करत कापूस जोपासला. मात्र, सुरुवातीला मिळणारा प्रतिक्विंटलचा भाव आज आठ हजार रुपयांवर आला आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांमध्ये धाकधूक वाढली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

SCROLL FOR NEXT