cotton price decreased in yavatmal  saam tv
ऍग्रो वन

Yavatmal Cotton Price: कापसाचा दर घसरला; जाणून घ्या नवीन दर

Cotton Price Decreased in Yavatmal: दरामध्ये अचानक घसरण झाली.

Siddharth Latkar

- संजय राठाेड

Yavatmal News : मार्च अखेरनंतर यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यातील बाजारपेठेत कापसाच्या दरात सुधारणा झाली हाेती. कापसाचे दर (cotton price) आठ हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत पोहोचले होते. आता पुन्हा कापसाचा दर घसरल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. (Maharashtra News)

खुल्या बाजारात कापसाचे दर आठ हजार चारशे रूपये पर्यंत जाण्याची शक्यता व्यवसायिकांनी वर्तविली. दरम्यान दरामध्ये अचानक घसरण झाली. कापसाचे दर सात हजार आठशे रूपये क्विंटल पर्यंत खाली घसरले आहेत.

यातून शेतकरी चांगलेच हादरले आहेत. खुल्या बाजारात कापसाच्या दरामध्ये सुधारणा झाल्याने कापूस बाजारपेठेत अचानक आवक वाढली. ही आवक कायम असताना दरामध्ये घसरण होण्यास सुरुवात झाली. गेले आठ दिवस दर चांगले होते. मात्र आता कापसाचे दर दिवसाला पन्नास रूपयांनी घसरले. याचे मुख्य कारण म्हणजे सरकीच्या दरात झालेली घसरण असल्याची व्यवसायिकांनी स्पष्ट केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT