वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्याने उडीद पिकावर फिरवला ट्रॅक्टर जयेश गावंडे
ऍग्रो वन

वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्याने उडीद पिकावर फिरवला ट्रॅक्टर

9 एकर शेतावर ट्रॅक्टर फिरवून उडीद पीक नष्ट केले.

जयेश गावंडे

अकोला - शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अकोल्यातील Akola सांगळूद येथील शेतकऱ्यांचे Farmer उडीद पिकांवर आलेल्या अज्ञात रोगामुळे उडीद पीक हातून गेला आहे. ऐन फुलोरा अवस्थेत असलेल्या पिकाला फुलगळती लागल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात रोटावेटर, ट्रॅक्टर फिरवून पीक नष्ट केले आहे. काही दिवसांपासून होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे परिसरातील शेकडो हेक्टर पीक खराब झाले आहे.

हे देखील पहा -

ऐन फुलोरा अवस्थेत असलेले उडीद पीक वातावरणातिल बदलांमुळे हातून गेले आहे. खर्चही निघण्याची शक्यता नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी उडीद पीक ट्रॅक्टर द्वारे नष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट आले आहे. लावलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

सांगळूद गावा मध्ये उडदाचे पीक हे चांगल्या प्रकारे आले होते परंतु वातावरणातील बदलामुळे संपूर्ण उडीदाचा फुलोरा निघून गेला आहे. सांगळुद येथील अरुण तायडे या शेतकऱ्याने आपल्या 9 एकर शेतावर ट्रॅक्टर फिरवून उडीद पीक नष्ट केले. त्यामुळे या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बहरलेले पीक हातातून गेल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

भाजपच्या दिग्गज नेत्याची त्यांच्या घराबाहेर हत्या; राजकारणाला हादरा, नेमकं काय घडलं?

Sugar Vs Rocksugar: साखर आणि खडीसाखर, चहासाठी काय बेस्ट? जाणून घ्या

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

SCROLL FOR NEXT