चंद्रपूर : उन्हाळ्यात गार अनुभव देणाऱ्या टरबूजची मागणी अधिक असते. यामुळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये लागवड करून मार्च- एप्रिलपासून उत्पादन येण्यास सुरवात होते. अर्थात टरबूज पीक उन्हाळ्यात एकदाच घेतले जाते. मात्र चंद्रपुरातील शेतकऱ्याने वर्षातून दोनदा हे पीक घेत नफा मिळवत प्रयोग यशस्वी करून दाखवला. प्रशांत शेजवळ नावाच्या युवा शेतकऱ्याने हे यश मिळवले आहे.
चंद्रपूरपासून २० किमीवर असलेल्या चिचपल्ली येथील प्रशांत शेजवळ या तरुण शेतकऱ्याने टरबूज लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. त्याने गावालगत असलेल्या नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या शेतात टरबुजाची शेती केली. मागील वर्षी दोन एकरात प्रशांत यांनी टरबूजचे उत्पादन घेतले. यात त्याला पहिल्याच वर्षी भरघोस उत्पन्न मिळाले. एकरी एक लाख रुपयांचा नफा यातून मिळाला होता. यामुळे पुन्हा लागवड करण्याचा निर्णय प्रशांत यांनी घेतला.
२५ टॅन उत्पादन येण्याची अपेक्षा
त्यानुसार प्रशांत यांनी यावर्षी दहा एकरात ही शेती केली असून, यावेळीही उत्पन्न जोरात आहे. उन्हाळ्यात घेतले जाणारे हे पीक त्याने ऑक्टोबर हिटमध्ये पण घेतले. तिथेही तो यशस्वी झाला. म्हणजे वर्षातून दोनदा टरबूजाचे उत्पन्न घेत आहे. आता त्याला सुमारे २५ टन एवढे उत्पादन होण्याची खात्री आहे. अर्थात वर्षभरातून दोन वेळेस टरबुजाची उत्पादन घेण्याचा त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.
खरेदीसाठी व्यापारी येतात बांधावर
विशेष म्हणजे टरबूज विकायला कुठेही बाहेर जाण्याची गरज पडत नाही. व्यापारी थेट शेतात येऊन टरबूज खरेदी करत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खर्च देखील लागत नाही. अर्थात टरबूज विक्रीतून येणारी रक्कम जशीच्या तशी राहत आहे. वर्षातून दोनदा पीक घेत असल्याने आर्थिकदृष्ट्या हा शेतकरी सक्षम झाला आहे. यात चांगला भाव देखील सापडत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.