Fengal Cyclone Saam tv
ऍग्रो वन

Fengal Cyclone : चक्रीवादळाचा प्रभाव; भातपीक धोक्यात, कापूस, तुरीलाही फटका

Chandrapur News : दक्षिण भारतात धडकलेल्या फेंगल चक्रीवादळाने चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही भागात पावसाच्या हलक्या सरी देखील पडल्या

संजय तुमराम

चंद्रपूर : दक्षिण भारतात फेंगल चक्रीवादळाने हाहाकार माजविला आहे. याचा प्रभाव राज्यातील अनेक भागात होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तर वादळाच्या प्रभावाने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. प्रामुख्याने भातशेती धोक्यात सापडली असून कापूस व तुरीच्या पिकाला देखील याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

दक्षिण भारतात धडकलेल्या फेंगल चक्रीवादळाने चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून काही भागात पावसाच्या हलक्या सरी देखील पडल्या आहेत. यामुळे धानाचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कापलेले धान शेतात रचून ठेवले जातात. संपूर्ण भात पट्ट्यात हीच पद्धत आहे. त्यामुळे अचानक आलेल्या पावसाच्या हलक्या सरींनी धान ओला झाला आहे. त्यामुळे भाताच्या प्रतवारीवर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. 

शेतकऱ्याला आर्थिक फटका 

भिजलेल्या धानाला भाव मिळत नसल्याने (Farmer) शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो. तर दुसरीकडे कापूस, तूर, हरभरा ही पिकेसुद्धा शेतात आहेत. ढगाळ वातावरणामूळे तूर पिकावर संकट आले. तुरीला फुलोरा आला आहे. पावसामुळे हा फुलोरा प्रभावित होऊ शकतो. अळीचा धोकाही यामुळे वाढला आहे. कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने कापूस शेतात उभा आहे. त्यात ढगाळ वातावरण आणि पावसाचा शिडकावा, यामुळे कापूसही दर्जाहीन होण्याची शक्यता आहे.   

धुळ्यात बियाणे विक्रीतून शेतकऱ्याची फसवणूक

धुळे : बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारांतर्फे व बियाण कंपनीतर्फे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू असल्याचा प्रकार धुळे जिल्ह्यात उघडकीस आला आहे. धुळे तालुक्यातील बोरकुंड शिवारामध्ये बियाण कंपनी आणि बियाणे विक्री करणाऱ्या दुकान मालकातर्फे शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिनाभरापूर्वी दगडू जाधव या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर शेतामध्ये पेरण्यासाठी हरभरा पिकाचे बियाणे विकत घेतले. परंतु हे बियाणं शेतात उगलेच नसून या संदर्भात दुकान मालकाला याबाबतची माहिती दिली असता बियाणे विक्री करणाऱ्या दुकान मालकाने शेतकऱ्याला उडवाउडवीचे उत्तर देत यामध्ये काहीही करू शकत नसल्याचे म्हणत नुकसान भरपाई न देता झुगारून लावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात वादळी पावसाचे थैमान

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरटचे आजचे दर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

Dandruff Home Remedy : केस धुवण्यापूर्वी करा 'हे' काम, टाळूला येणार नाही खाज अन् कोंडाही होईल गायब

SCROLL FOR NEXT