Agriculture: एक एकरात केळीची लागवड करुन तब्बल सहा लाखांच वार्षिक उत्पन्न... दिलीप कांबळे
ऍग्रो वन

Agriculture: एक एकरात केळीची लागवड करुन तब्बल सहा लाखांच वार्षिक उत्पन्न...

इंद्रायणी भाताचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळात एका अवलियाने वेगळा प्रयोग केला आहे. एका एकरात सेंद्रिय पद्धतीने केळीचे उत्पन्न घेऊन वर्षाला हा शेतकरी तब्बल सहा लाख रुपये कमवत आहे.

दिलीप कांबळे

मावळ: इंद्रायणी भाताचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळात लाखो क्विंटल भात शेतकरी पिकवतात. मात्र साळुंब्रे गावच्या एका शेतकऱ्याने या भाताच्या पारंपरिक पिकाला फाटा देत सेंद्रिय पद्धतीने एका एकरात केळीचे पीक घेऊन मावळात एक वेगळाच प्रयोग केलाय. एका एकरात केळीचे पीक घेऊन वर्षाला सहा लाख रुपये कमवणं शक्य असल्याचं या शेतकऱ्याने दाखवून दिलं आहे. (By cultivating one acre of banana, the annual income is six lakhs.)

हे देखील पहा -

मावळमधील (Maval) साळुंब्रे गावचे प्रयोगशील शेतकरी (Farmer) बाबासाहेब राक्षे यांच्याकडे वडिलोपार्जित आठ एकर शेती आहे. या शेतात ते पारंपारिक पद्धतीने भात, ऊस, मिरची अशा प्रकारचे पिके घेत होते. मात्र आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं त्यांना वारंवार वाटत होतं. अनेक मित्रांच मार्गदर्शन घेऊन आपल्या एक एकरात त्यांनी सेंद्रिय पद्धतीनं केळी घेण्याचं ठरवलं. प्रथम त्यांनी घरच्याच ट्रॅक्टरने आपली एक एकर शेती सपाट केली. गादी वाफे तयार करून बेंगलोरवरून आणलेले जवाहर देशी केळीचे (Banana) रोप आणले आणि त्याची एकूण पाचशे पन्नास रोपे झाडांमध्ये पाच फूट अंतर ठेऊन ओळींमध्ये नऊ फूट अंतर ठेऊन लावली. वर्षभर सेंद्रिय पद्धतीने खत दिले. यात कोंबडी खत, शेणखत टाकले एक वेळेस फवारणी करून मशागत केली असता आज हे पीक अगदी जोमात आले आहे.

हे सर्व करताना त्यांना वर्षाला ऐंशी हजार रुपये खर्च आलाय. दरम्यान हे केळीचे झाडे जास्तीत जास्त सात ते आठ फूट उंच वाढत असल्याने वादळाचा याला त्रासही होत नाही. शिवाय वातावरणात झालेला बदल ही केळी सहज सहन करते आणि याचा परिणाम उत्पन्नावर होत नाही. सध्या काही झाडांना वीस ते पंचवीस किलोपर्यंत वजनाचे घड आले आहे. सध्या भाव जरी कमी असला तरी एका एकरातील उत्पादनातून ऐंशी हजार खर्च वजा करता सहा लाख रुपये निव्वळ नफा मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे.

प्रत्येक केळीच्या झाडाला वीस किलो जरी उत्तर धरले आणि चारशे झाडेच हिशोबात धरली तरी सुमारे दहा टन उत्पादन मिळु शकते. विशेष म्हणजे केळीचे पाने विकुन दर महिन्याला पाच ते सहा हजार रुपयेही उत्पन्न त्यांना मिळते. त्यामुळे त्यांना पैशांची चणचण भासत नाही. पारंपरिक भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना हा प्रयोग जरी नवीन असला तरी मावळात मात्र यशस्वी होतोय हे महत्त्वाचे आहे. म्हणजे या सेंद्रिय पद्धतीने केळीची शेती करायला काही हरकत नाही. दरम्यान मावळात आणखी केळीच क्षेत्र वाढले तर थेट शेतात येऊन व्यापारी माल खरेदी करतील हे नक्की.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT