बिबट्याचा धुमाकूळ; आठवडाभरात पाच जनावरांचा फडशा

बिबट्याचा धुमाकूळ; आठवडाभरात पाच जनावरांचा फडशा
Leopard
Leopard
Published On

शिरपूर (धुळे) : मांजरोद (ता. शिरपूर) परिसरातील उसाच्या शेतामध्ये बिबट्याचा मुक्तसंचार असून, आठवडाभरात त्याने पाच जनावरांचा फडशा पाडल्यामुळे दहशत पसरली आहे. ऊस तोडणीवर आला असतानाच बिबट्याचे संकट उभे ठाकल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. वन विभागाने तातडीची उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे. (dhule-news-shirpur-Leopard-drooping-Five-animals-in-a-last-week)

Leopard
प्रेमसंबंधातून केला दुसरा विवाह; परंतु चारित्र्याच्या संशयाने केला घात

दोन आठवड्यांपूर्वी बिबट्या (Leopard) दिसल्याची चर्चा मांजरोद परिसरात होती. मात्र त्याचे अस्तित्व जाणवण्यास २१ डिसेंबरपासून सुरवात झाली. त्या दिवशी बिबट्याने सुभाष खंडू पाटील यांच्या शेतातील म्हशीच्या पारडूची शिकार केली. २४ डिसेंबरला वासुदेव श्यामसिंह राजपूत यांच्या शेतातील गोठ्यात गायीचा फडशा उडविला. २६ डिसेंबरला योगेंद्र भरत पाटील यांच्या शेतात कुत्र्याचा फन्ना उडविला. २७ डिसेंबरला एका मोकाट कुत्र्याचा फडशा पाडला. २८ डिसेंबरला पहाटे रानडुकराची शिकार बिबट्याने साधली.

शिवारात मुक्तसंचार

मांजरोदसह जापोरा परिसरापर्यंत बिबट्याचा संचार असल्याचे दिसून आले आहे. मांजरोद (ता. शिरपूर) (Shirpur) शिवारातील संदीप पाटील यांच्या शेतात बिबट्याने रानडुकराची शिकार केली. रानडुकराला ओढत नेताना तेथील रखवालदारांनी पाहिले. रानडुकरे हाकलण्यासाठी राखून ठेवलेल्या मोठ्या आवाजाचे फटाके वाजवून त्यांना बिबट्याला पळवून लावले. मात्र पळतानाही रानडुक्कर सोबत नेऊन बिबट्या जापोऱ्याचे सरपंच दिगंबर पाटील यांच्या शेतात शिरला. रानडुकराच्या शरीराचा उर्वरित भाग तेथे आढळला. यापूर्वीही वेळोवेळी शेतकरी (Farmer), शेतमजुरांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगण्यात आले.

शेतकरी भयभीत

मांजरोद परिसरातील बहुतांश क्षेत्रावरील ऊस (Sugarcane) तोडणीवर आहे. गहू, हरभऱ्याला पाणी देण्याचे काम सुरू आहे. भारनियमनामुळे वीज रात्रीच उपलब्ध असते. त्यामुळे रात्री-बेरात्री शेतात जाणे भाग पडते. अशा वेळी बिबट्याचे संकट उभे ठाकल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. बिबट्याने अद्याप मनुष्यवस्तीकडे मोहरा वळविला नसला तरी ऊसतोड मजुरांमध्ये बिबट्याची दहशत पसरल्यास तोडणीवर परिणाम होऊन मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com