Sugarcane Fire दीपक क्षीरसागर
ऍग्रो वन

भिसे वाघोलीत 70 एकरावरील ऊस जाळून खाक; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

आग लागल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी मांजरा आणि विकास कारखान्यास संपर्क केला. विकास सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या.

दीपक क्षीरसागर

लातूर - तालुक्यातील भिसे वाघोली इथं जवळपास 20 शेतकऱ्यांच्या शेतातील 70 एकर ऊस जाळून खाक झाल्याची घटना घडली आहे. आग लागल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी (Farmer) मांजरा आणि विकास कारखान्यास संपर्क केला. विकास सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या (Fire Bridage) गाड्या दाखल झाल्या होत्या. ही घटना काल घडली असल्याची माहिती समोर आली आहे. (Latur Latest News)

हे देखील पहा -

काल दुपारी एक ते दीडच्या दरम्यान भिसे वाघोली येथील जवळपास 20 शेतकऱ्यांचा 70 एकर ऊस जळून खाक झाला. अचानक आग लागल्याचे दिसल्यामुळे गावकरी तात्काळ जमा झाले. आगीचा वेग इतका भीषण होता की, त्याच्यापुढे काहीही करता आले नाही आणि बघता बघता दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आगीने जवळपास साठ सत्तर एकर क्षेत्र व्यापून टाकले. पाहावे तिकडे आगीचे लोळ दिसत होते.

वाघोली येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संभाजी वायाळ यांनी मांजरा विकास कारखान्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून याची तात्काळ कल्पना दिली असता विकास कारखान्याची अग्निशामक दलाची गाडी तात्काळ हजर झाली.

दिलीपराव देशमुख साहेब व आमदार धीरज देशमुख यांनी संभाजी वायाळ यांना फोन करून सर्व ऊस तात्काळ नेण्यात येईल असे सांगितले शेवटी राहिलेला ऊस वाचवण्यासाठी अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून उर्वरित ऊस वाचवला. तरी संबंधित कारखान्यांनी तात्काळ यंत्रणा राबवून जळालेला ऊस त्वरित घेऊन जाऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

झाड कोसळून आणखी दोघांचा मृत्यू; मुंबईकरांचा वाली कोण? मुर्दाड महापालिकेला कधी जाग येणार?

Pune School: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

School Holiday: मोठी बातमी! ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह नवी मुंबईतील सर्व शाळांना उद्या सुट्टी

Pune News: कात्रज तलावाच्या कठड्यावरून खाली पडला, ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- चिपळूणच्या वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडली

SCROLL FOR NEXT