Buldhana News Saam tv
ऍग्रो वन

Unseasonal Rains : अवकाळी पावसामुळे हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव; शेतकऱ्याने फिरवला रोटाव्हेटर

Buldhana News: अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे हरभरा पिकावर मर रोग तथा अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले

Rajesh Sonwane

संजय जाधव 
बुलढाणा
: ढगाळ वातावरण व वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाचा सध्या रब्बी पिकांना मोठ्या (Buldhana) प्रमाणात फटका बसला आहे. प्रामुख्याने हरभरा पिकाला याचा अधिक फटका बसला असून हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या (Farmer) प्रमाणात वाढला आहे. यामुळे शेतकऱ्याने हरभऱ्यावर रोटाव्हेटर फिरविले. (Breaking Marathi News)

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुका व परिसरात रब्बीच्या हंगामात (Rabi Crops) गहू आणि हरभरा ही मुख्य पिके घेतली जातात. अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे हरभरा पिकावर मर रोग तथा अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. यामुळे परिसरातील हरभरा पिकाचे नुकसान होत असल्याने आसलगाव येथील शेतकरी देविदास घोपे यांनी आपल्या उभ्या हरभरा पिकावर रोटावेटर चालवले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खरीप हंगामही गेला होता वाया 

२२ जुलैला जळगाव जामोद तालुका परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाची पिके जमीन दोस्त झाली आहेत. अशातच शेतकऱ्यांना रब्बीच्या पिकांकडून अपेक्षा असताना अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

jio 365 days Plan: वर्षभर रिचार्जची गरज नाही! Jioचा 365 दिवसांचा धमाकेदार प्लॅन; 2.5GB डेटा, किमंत फक्त...

Maharashtra Live News Update : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया

Pune : पुण्यातील सरकारी हॉस्टेलमध्ये दूषित पाणी, २० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

Diabetes Symptoms: पायांमध्ये होणारे हे बदल देतात मधुमेहाचे संकेत; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Gold Rate Today: चांदी ५ हजारांनी घसरली, तर सोन्याचे दरही झाले स्वस्त, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

SCROLL FOR NEXT