बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून सततच्या अवकाळीने फळबागासह भाजीपाला, कांदा, आंबा पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामधे चिखली, (Buldhana) बुलढाणा, मेहकर, खामगाव, मोताळा तालुक्यात प्रचंड गारपीट, अवकाळी पाऊस (Rain) झाला. एकीकडे शासकीय कर्मचारी पंचनामे करून जातात. मात्र पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीट होतेय, त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. (Latest Marathi News)
चिखली तालुक्यात मागील चार ते पाच दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस, गारपीट होत असून पिकाचे नुकसान होत आहे. सवणा येथील ज्ञानेश्वर मिसाळ यांच्या दोन एकर मोसंबी शेतात अवकाळी पावसाने मोसंबीचे प्रचंड नुकसान झाले. लाखो रुपये खर्च करून लहान मुलांप्रमाणे (Farmer) शेतकरी ज्ञानेश्वर मिसाळ यांनी मोसंबीची झाडे लहानची मोठी केली. विहिरीला पाणी नसताना परिसरातील शेतकऱ्यांकडून पाणी घेऊन मोसंबीची बाग जगविली. आता झाडांना फळे लागली असून अवकाळी पावसाने मात्र त्यांचे प्रचंड नुकसान झाले.
नुकसानीची पाहणी करायला आलेच नाही
नुकसान होऊनही शासनाचा एकही कर्मचारी, अधिकारी शेतात पाहणीसाठी सुद्धा आला नाही. याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी; अशी मागणी ज्ञानेश्वर मिसाळ या शेतकऱ्याने केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.