Arun Gandhi Passed Away: महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधींचे निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Arun Gandhi Death News: मंगळवारी कोल्हापूरात पहाटे साडेपाच वाजता अरुण गांधींची प्राण ज्योत मावळली.
Arun Gandhi
Arun GandhiSaam TV
Published On

रणजीत माजगावकर

Kolhapur News : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू आणि तुषार गांधी यांचे वडील अरुण गांधी यांचे दु:खद निधन झाले आहे. मंगळवारी कोल्हापूरात पहाटे साडेपाच वाजता अरुण गांधींची प्राण ज्योत मावळली. (Latest Marathi News)

हणबरवाडी इथल्या अवनी संस्थेत त्यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी अरुण गांधी यांनी अखेरचा श्वास घेतला. लेखक आणि सामाजिक-राजकीय कार्यकर्ते अरुण गांधी यांच्या पार्थिवावर कोल्हापुरातील (Kolhapur) हणबरवाडी परिसरात अंत्यसंस्कार होणार आहेत. पुत्र तुषार गांधी यांनी याबाबत माहिती दिली.

Arun Gandhi
Mumbai Crime News: महिलेवर अंधाधुंद गोळीबार करणारे आरोपी पोलिसांच्या अटकेत; घटनेमागचं खरं कारण काय?

१४ एप्रिल १९३४ रोजी डर्बन येथे अरुण गांधी यांचा जन्म झाला. ते मणीलाल गांधी आणि सुशीला मश्रुवाला यांचे पुत्र होते. अरुण गांधींचे आजोबा देखील समाजसेवक होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अरुण गांधी यांनी देखील समाजसेवेस सुरूवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com