Sindkhedraja News Saam tv
ऍग्रो वन

Sindkhedraja News : सिंदखेडराजात शेतकऱ्याचा बैलगाडा मोर्चा; महायुती सरकारविरोधी घोषणाबाजी

Buldhana News : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चा माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात काढण्यात आला

संजय जाधव

बुलढाणा : शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा, सरसकट कर्जमुक्ती करावी यासह अन्य मागण्यांसाठी आज सिंदखेडराजा येथे शेतकऱ्यांचा भव्य बैलगाडा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले असून शेतकऱ्यांनी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. 

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चा माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. जिजाऊ राजवाडा येथून या मोर्च्याला सुरुवात करण्यात येऊन सिंदखेडराजा (sindkhedraja) तहसील कार्याल्यावर धडकला. मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चामध्ये शेतकरी विरोधी धोरणाचा निर्णय घेणाऱ्या महायुती सरकारचा घोषणाद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला. यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. 

अशा करण्यात आल्या मागण्या 

तहसील कार्यालयावर मोर्चा काढत प्रामुख्याने (Farmer) शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, रखडलेली पीक विम्याची रक्कम देण्यात यावी, सोयाबीनला किमान ७ हजार तर कापसाला १२ हजार रुपये भाव द्यावा; या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. तसेच या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटीनंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ

HPV विषाणूमुळे होऊ शकतो घशाचा कॅन्सर; रुग्णांमध्ये कोणती लक्षणे दिसतात

Sunday Horoscope : जोडीदार साथ देणार, ५ राशींच्या व्यक्तीचा यशाचा मार्ग खुला होणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Aamir Khan Wedding: 'मिस्टर परफेक्शनिस्ट'च्या घरी लग्नाची लगबग; आमीर खान 2 आठवड्यात विवाह बंधनात अडकणार

Parbhani Hanuman Temple: परभणीत मोठी दुर्घटना; हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, 7 जणांचा मृत्यू, 32 भाविक जखमी

SCROLL FOR NEXT