Buldhana News Farmer Saam tv
ऍग्रो वन

Farmer: दिवसभर सोयाबीन केला जमा; शेतातच मुक्‍काम अन्‌ शेतकऱ्याने केली आत्महत्या

दिवसभर सोयाबीन केला जमा; शेतातच मुक्‍काम अन्‌ शेतकऱ्याने केली आत्महत्या

संजय जाधव

बुलढाणा : दिवसभर शेतात सोयाबीन जमा केल्यानंतर अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचा अंदाज आला. मात्र रात्री शेतातच मुक्‍काम केला अन्‌ यानंतर युवा शेतकऱ्याने (Farmer) गळफास घेत मृत्यूला कवटाळले. (Letest Marathi News)

लोणार (Buldhana) तालुक्यातील गोवर्धन नगरात सदर घटना घडली. संदिप रमेश चव्हाण (वय ४२, रा. गोवर्धन नगर) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संदिप चव्हाण हे त्याच्या वसंतनगर शिवारातील शेतात (Soybean) सोयाबीन जमा करण्यासाठी गेले होते. यंदा सुरुवातीला झालेला अपुरा पाऊस (Rain) आणि सोंगणीच्या वेळी झालेली अतिवृष्टी यामुळे सोयाबीनचे गणित हुकले.

शेतातच केला मुक्‍काम

दिवसभर काम केल्‍यानंतर अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याचा अंदाज आला. यामुळे संदीप चव्हाण हे चिंतेत होते. दिवसभर शेतात काम केल्यानंतर रात्री त्यांनी शेतातच मुक्काम केला. मात्र सकाळी शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. बिबी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT