Buldhana News Saam tv
ऍग्रो वन

Buldhana News: सततची नापिकी, कर्जफेडीची विवंचना; अल्‍पभुधारक शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

सततची नापिकी, कर्जफेडीची विवंचना; अल्‍पभुधारक शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

संजय जाधव

बुलढाणा : सततची नापिकी व कर्जबाजारीपणात कायम विवंचनेत राहत होते. यातून कंटाळून गुरांच्या (Buldhana) वाडग्यातील निंबाच्या झाडाला दोराच्या साह्याने गळफास घेऊन अल्पभूधारक वृद्ध शेतकऱ्यांनी (Farmer) आत्महत्या केल्याची घटना घडली. (Tajya Batmya)

आसलगाव (बुलढाणा) येथील अल्पभूधारक शेतकरी समाधान तुकाराम मनसुटे (वय ६०) असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. समाधान मनसुटे यांची आसलगाव शेत शिवारात पावणेतीन एकर शेती असून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर व मजुरीवर अवलंबून आहे. त्यांच्यावर बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेचे २५ हजार रुपये कर्ज व खाजगी कर्ज सुद्धा होते.

सततच्या नापीकीमुळे सातत्याने बँकेचे कर्ज व खाजगी कर्ज हे वाढत चालले होते. यामुळे या कर्जाची परतफेड कशी करावी या विवंचनेत समाधान मनसुटे होते. यातून त्‍यांनी स्वमालकीच्या गुरांच्या वाडग्यातील निंबाचे झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा आप्त परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning heart attack risk: सकाळच्या वेळी हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त का असतो? समजून घ्या यामागील कारण

इंजिन सोडून, धनुष्यभाण हाती, ऐन निवडणुकीत राज ठाकरेंना मोठा धक्का; प्रकाश महाजनांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश|VIDEO

Orange Benefits: थंडीत आंबट-गोड संत्री खल्ल्याने कोणते आरोग्यदायी फायदे मिळतात

Maharashtra Live News Update: उबाठा गटाला महापालिका निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का!

खोपोलीत नगरसेविकेच्या पतीची हत्या, भरत गोगावलेंचा राष्ट्रवादीवर आरोप|VIDEO

SCROLL FOR NEXT