Lightning Strike Saam tv
ऍग्रो वन

Lightning Strike : विज पडल्याने गोठा जळून खाक; २ जनावरांचा मृत्यू, ६ लाखांहुन अधिक नुकसान

Buldhana News : हवामान विभागाने अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस होत आहे. यात वीज पडल्याच्या घटना देखील घडत असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे

संजय जाधव

बुलढाणा : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. यात अनेक ठिकाणी वीज पडून पशुधनाचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. अशीच घटना मेहेकर (Mehkar) तालुक्यातील नागापुर येथे रात्रीच्या दरम्यान घडली असून वीज पडल्याने गोठ्याला आग लागून दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

हवामान विभागाने अवकाळी पावसाची (Rain) शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस होत आहे. यात वीज (Lightning Strike) पडल्याच्या घटना देखील घडत असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान (Buldhana) बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यातील नागपूर येथे ही घटना घडली. माधव प्रकाश गायकवाड यांनी जनावरांसाठी बांधलेल्या गोठ्यावर विज पडून यामध्ये एक गाय व एक म्हैस जळून खाक झाली. तर एक गाय व एक बैल ९० टक्के भाजला गेला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गोठ्यातील साहित्यही जळून खाक 

तसेच गोठ्यात असणारे शेती उपयोगी स्प्रिंकलरचे दोन संच, पियूसी पाईप जनावराचे खाद्य, हळदीचे कांडे, टिनपत्रे व तर शेती साहित्य जळून खाक झाले आहे. यात अंदाजे एकुण ६ लाख ५७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनैची माहीती मीळताच माजी क्रृषी सभापती राजेंद्र पळसकर व शिवसेना शहर प्रमुख सुरज दिनोरे, नागापुर सरपंच समाधान गायकवाड तसेच तलाठी व पशुसंवर्धन अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली, यावेळी तलाठी यांनी पंचनामा करून वरीष्ठांना सादर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

LPG Cylinder Price: एलपीजी सिलेंडर ६५८ रुपयांनी स्वस्त मिळतोय, १०.५८ कोटी कुटुंबांना ९५८ रुपयांचा बंपर फायदा, पाहा नेमकं गणित

Weekly Horoscope: या राशींनी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं; वाचा तुमचं साप्ताहिक राशीभविष्य

भल्या पहाटे ८.२ तीव्रतेच्या भूकंपाने जमीन हादरली, 'या' देशाला त्सुनामीचा इशारा

Period changes with age: २०, ३० आणि ४० नंतर मासिक पाळीच्या फ्लो होतो बदल, डॉक्टरांनी सांगितली प्रत्येक वयोगटातील महत्त्वाची कारणं

SCROLL FOR NEXT