गिरडा येथे कर्जबाजारीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या... संजय जाधव
ऍग्रो वन

गिरडा येथे कर्जबाजारीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या...

सेंट्रल बँक शाखा पाडळीचे 1 लाख 20 हजार रुपये तसेच एका पतसंस्थेचे 1 लाख रूपयांचे कर्ज होते.

संजय जाधव

बुलढाणा - सततची नापिकी कर्जबाजारीला कंटाळून बुलढाणा तालुक्यातील गिरडा येथील एका 58 वर्षीय शेतकऱ्याने गुरांच्या गोठ्यात गळफास घेवून आत्महत्या केली. बुलढाणा तालुक्यातील गिरडा येथील शेतकरी सुभाष काशिनाथ गाडेकर यांच्याकडे साडेतीन एकर शेती आहे. शेतीच्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु मागील वर्षीची नापिकी व यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक हातचे गेल्याने शेतीला लावलेला खर्च सुध्दा निघाला नाही. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढतच गेला.

हे देखील पहा -

घरातील कर्ता पुरुष असल्याने कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करावा, कर्ज कसे फेडावे या विवंचनेतच त्यांनी गुरांच्या गोठ्यात गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांना 15 दिवसांपूर्वीच कर्जाची परतफेड करण्यासाठी एका पतसंस्थेची नोटीस आल्याचेही मुलाने सांगितले. त्यांच्यावर सेंट्रल बँक शाखा पाडळीचे 1 लाख 20 हजार रुपये तसेच एका पतसंस्थेचे 1 लाख रूपयांचे कर्ज होते. याबाबत बुलढाणा ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या बसची चावी घेऊन ठोकली धूम; जंतर-मंतरवर महिलेचं कृत्य पाहून पोलीस चक्रावले, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी पप्या शिंदेच्या पोलीस कोठडीत वाढ; 9 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

SCROLL FOR NEXT