बुलढाणा: अतिवृष्टीने 18 गावातील 950 शेतकऱ्यांचे 600 हेक्टर चे नुकसान संजय जाधव
ऍग्रो वन

बुलढाणा: अतिवृष्टीने 18 गावातील 950 शेतकऱ्यांचे 600 हेक्टर चे नुकसान

बुलढाणा, मोताळा तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांचे नुकसान.

संजय जाधव

बुलढाणा जिल्ह्यात (Buldhana District) सहा सप्टेंबरच्या रात्रीपासून सर्वदूर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, ज्यामध्ये आज पर्यंत बुलढाणा तालुक्यात 47 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली, मात्र सर्वाधिक पैनगंगा नदीचा उगम असलेल्या पाडळी परिसरात 24 तासात 184 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पैनगंगा नदीला मोठा पूर आल्याने या नदीकाठी शेतामध्ये पुराचे पाणी शिरले आहे, त्यामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीची तात्काळ पाहणी करून सर्वेक्षण करण्याचे निर्देश आमदार संजय गायकवाड यांनी दिले होते, त्यानुसार संबंधित विभागाने झालेल्या नुकसानीचा तात्काळ सर्वे करण्यास सुरुवात केली आहे.

ज्यामध्ये बुलडाणा तालुक्यातील सात महसूल मंडळातील 18 गावांचे मोठे नुकसान झाले असून 950 शेतकऱ्यांचे 600 हेक्टर क्षेत्रफळ प्रभावित झाले आहे. या सर्व नुकसानीची शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून केली जात आहे. त्याचबरोबर प्रशासनाकडून जिल्ह्यात इतर ठिकाणी झालेल्या नुकसानीचे सर्वे देखील युद्धपातळीवर करण्यात येत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

ZP ची बनावट कागदपत्रं बनवून उभारली इमारत; शिंदे गटाच्या दोन नेत्यांना अटक

Sharad Pawar : महायुतीत चौथा भिडू येणार? पवारांच्या एन्ट्रीनं शिंदेंचं टेन्शन वाढणार?

जयंत पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, डिलिमिटेशनसाठी पवार एनडीएसोबत? दिग्गज नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: आमदार-नगरसेवक वाचवण्यासाठी धावाधाव; ठाकरे सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT