blue rice farming by lahu phale in mulshi saam tv
ऍग्रो वन

Success Story: निळ्या तांदळाच्या शेतीचा मुळशीत यशस्वी प्रयाेग, 250 रुपये प्रतिकिलो मिळताेय भाव; वाचा तांदळाचे महत्व

या प्रयाेगासाठी तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे तसेच कृषी सहाय्यक शेखर विरणक यांचे मार्गदर्शन लाभले.

दिलीप कांबळे

Maval News :

पुणे जिल्ह्यातील मावळ मुळशी (mulshi) भागांत मोठ्या प्रमाणात इंद्रायणी भाताचे (indrayani rice) पीक घेतले जाते. या भागातील इंद्रायणी भाताला देखील मोठ्या प्रमाणात राज्यात मागणी आहे. मात्र मलेशिया, थायलंड सारख्या देशात घेण्यात येणारा निळया रंगाच्या भाताचे पीक (blue rice farming) घेण्याचा प्रयोग मुळशी मधील लहू फाले (lahu phale) या शेतकऱ्याने केला आहे. अगदी कमी कालावधीत हा भात तयार झाला आणि या भाताला शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील देत असल्याचे पहायला मिळत आहे. (Maharashtra News)

मुळशी तालुक्यातील चिखलगाव येथील प्रयोगशील शेतकरी लहू फाले यांनी खरीप हंगामात निळ्या रंगाच्या भाताची लागवड केली होती. तो आता तयार झाला आहे. त्याचा तांदूळ निळसर गडद जांभळ्या रंगाचा आहे.

असे आहेत फायदे

हा भात मलेशिया, थायलंड येथेच उत्पादित होतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे याला सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केला आहे. त्यामुळे बाजारात त्याला अधिक मागणी आहे. सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला निळा भात आरोग्यवर्धक असून यात लोह, झिंक, कॅल्शियम आणि भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असून हा तांदूळ मधुमेह, असणाऱ्या रुग्णांसाठी उपयोगी आहे. हृदयरोग आणि कर्करोगा सारख्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांसाठी गुणकारी आहे.

लहू फाले यांनी मुळशी तालुक्यात हा पहिलाच प्रयोग केला आहे. यासाठी त्यांना तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे तसेच कृषी सहाय्यक शेखर विरणक यांचे मार्गदर्शन लाभले. या भाताची उंची सात फुटांपर्यंत होते व तो 110 ते 120 दिवसांत काढणीसाठी तयार होतो. भाताचे उत्पादन एक एकरात 1600 किलोपर्यंत होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ह्या भातास प्रतिकिलो 250 रुपये बाजारभाव मिळतो. औषधी गुणधर्मामुळे भात खरेदी करण्यासाठी शहरातील ग्राहक मोठ्या प्रमाणात पसंती देतात.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT