biur farmers grow gavati chaha and earns lakh rupees saam tv
ऍग्रो वन

Success Story : शेतक-यांनी करुन दाखवलं! बिऊरच्या गवती चहाला मुंबईकरांची पसंती, लाखाेंची उलाढाल

गेल्या चार-पाच वर्षांपासून या परिसरात काही शेतकऱ्यांनी हे पीक घ्यायला सुरुवात केली आहे.

विजय पाटील

Sangli News :

शेतक-यांनी ठरवलं तर काय हाेऊ शकत नाही हे बिऊर (biur village in sangli) गावातील सुमारे 70 हून अधिक शेतक-यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी आपल्या गावाची ओळख गवती चहाचे (gavati chaha) गाव असे राजधानीपर्यंत निर्माण केली. यामुळेच आता त्यांच्या गवती चहाला माेठी मागणी वाढू लागली आहे. (Maharashtra News)

शेतीवर उदरनिर्वाह असणारे शेतकरी पैसा मिळवून देणाऱ्या पिकाकडे वळत असून नवनवीन प्रयोग करत आहेत. अलीकडच्या काही वर्षात वातावरणातील बदल अवकाळी पावसाचा फटका अन अशा अनेक कारणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी शेतीवर उदरनिर्वाह असणाऱ्या शेतकऱ्यांचा वर्षभर उत्पादन देणाऱ्या पिकाकडे कल वाढला आहे.

गवतीच्या ही वनस्पती असून एक बारमाही सुवासिक गवत आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. लागवडीनंतर चार-पाच महिन्यांनी पहिली कापणी सुरू होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानंतरची कापणी दर तीन महिन्याने करता येते साधारणपणे वर्षात चार कापण्या होतात. गेल्या चार-पाच वर्षांपासून या परिसरात काही शेतकऱ्यांनी हे पीक घ्यायला सुरुवात केली आहे. अनुभव नसल्याने थोडाफार तोटाही सहन करावा लागला मात्र नंतर तंत्रज्ञानाची जोड देऊन सेंद्रिय खत व जिवाणू खतांचा वापर केला. पाण्याचे नियोजन वेळेवर अंतर मशागत कीटकनाशकांचा वापर याचा सांगड घालून उत्पादन घ्यायला सुरुवात झाली.

गवती चहाला मुंबईतील मार्केटमध्ये मोठी मागणी

मुंबई मार्केटमध्ये या शिराळा तालुक्यातील अनेक व्यावसायिक आहेत. त्यामुळे येथे माल पाठवायला सुरुवात झाली. कमी खर्चात उसापेक्षा जास्त उत्पादन मिळत असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी गवती चहाची लागवड केली आहे.

यामुळे अनेक जण आवर्जून गवती चहा पितात. त्याचबरोबर यामध्ये जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते. गवती चहाचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्यामुळे मुंबई मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. सरासरी 30 ते 40 रुपये प्रति किलो दर मिळतो.

ही काळजी घ्या

लागवडी पूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे. लागवडीसाठी ओळी 440 आर एल १६ या जातीची निवड करावी. हेक्टरी २२ हजार कोंब लागतात पहिल्या दोन वर्षात हेक्‍टरी 20 टन ओल्या गवताचे उत्पादन मिळते असे शेतकरी वर्गाने सांगितले आहे..

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT