Bhandara Rain Saam tv
ऍग्रो वन

Bhandara Rain: दमदार पावसानंतर बी - बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

दमदार पावसानंतर बी - बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

साम टिव्ही ब्युरो

भंडारा : सुमारे १५ दिवस मृगाच्या पावसाने हुलकावणी दिल्यानंतर गुरुवारपासून भंडारा जिल्ह्यात दमदार पावसाने (Bhandara) हजेरी लावली आहे. शेतकरी बांधवांनी उन्हाळ्यात शेतीची मशागत करून पावसाच्या प्रतीक्षेत होते. आता पावसाचे आगमन झाले असून शेतकरी (Farmer) बांधवांची बी- बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. (Tajya Batmya)

खरीप हंगामात शेतकऱ्यांची होणारी लुबाडणूक लक्षात घेता कृषी विभागानं जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक आणि जिल्हा कृषी विभागाचं एक असे आठ भरारी पथक नेमले असून कृषी केंद्रांवर करडी नजर ठेवून आहेत. मान्सूनचे आगमन झाल्यानंतरही (Rain) पावसाच्या हजेरीकडं सर्वांच्या नजरा असताना आता पाऊस पडला आहे. त्यामुळे आता पऱ्हे टाकण्यापासून ते बि- बियाणे खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रात गर्दी करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

जिल्‍ह्यात चांगला पाऊस

भंडारा जिल्‍ह्यात गुरूवारपासून दमदार पावसाला सुरवात झाली आहे. यामुळे पेरणीच्‍या प्रतिक्षेत असलेला शेतकरी आता पेरणी करायला लागला आहे. दमदार पावसामुळे वातावरणात देखील गारवा निर्माण झाला असून शेतकरी बांधव आणि सर्वसामान्य नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरकारचे शिष्ट मंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार

हादरवणारी बातमी! जापानमध्ये हिंगोलीच्या २५ वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; नेमकं झालं काय?

10 Gram Gold Mangalsutra : 10 ग्रॅम सोन्यामध्ये बनवा सुंदर मंगळसूत्र; ‘या’ 5 स्टायलिश डिझाईन्स पाहुन नवराही होईल खूश

Apple CEO Resign : Apple चे CEO टिम कुक यांचा राजीनामा! सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती; नवे सीईओ कोण? जाणून घ्या

Jeeryach Paani: जिऱ्याचं पाणी की अॅपल सायडर व्हिनेगर? वजन कमी करण्यासाठी सकाळी काय प्यावं?

SCROLL FOR NEXT