भंडाऱ्यात धान खरेदी केली, परंतू अद्याप पैसे नाही; शेतकरी आर्थिक चिंतेत 
ऍग्रो वन

भंडाऱ्यात धान खरेदी केली, परंतू अद्याप पैसे नाही; शेतकरी आर्थिक चिंतेत

भंडारा जिल्हा हा राज्यात धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो.

अभिजीत घोरमारे

भंडारा: कोणी पैसा देतं कारे पैसा! ही आर्त हाक आहे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची? शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्रातून शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील धान खरेदी केल्यास मात्र त्याचे पैसे न अद्याप शासनाकड़ून न आल्याने जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक चिंतेत पड़ले आहेत.

भंडारा जिल्हा हा राज्यात धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. धान हे प्रमुख पिक असल्याने शासनाकडून खरीप व रब्बी हंगामातील धानाची आधार भूत धान खरेदी केंद्रातून खरेदी केली जाते. जिल्ह्यात 22 जून पासून रब्बी हंगामातील धान खरेदीस सुरुवात झाली असून जिल्ह्यातील 55 हजार 500 शेतकऱ्यांकडून तब्बल 22 लाख क्विंटल धान शासनाने खरेदी केल आहे. ह्या खरेदी धानाची किंमत 419 कोटी रुपये आहे. मात्र यापैकी शासनाने केवळ 96 कोटी रूपये दिले असून 323 कोटी रूपये बाकी आहे.

अद्याप 2 महिन्याचा कालावधी होऊन सुद्धा पैसे न मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यांमुळे तोंडावर आलेल्यां खरीप हंगमाचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हातउसने करून रोवनी केली खरी मात्र आता खते-किटकनाशके फवारणी यासाठी पैसेच नसल्याने शेतकरी चितेत पडला आहे. शेतकरी डोक्यावर हात ठेवून शासनाच्या मदतीकड़े नजरा लावून बसला आहे.

तर ह्या बाबत जिल्हाचे पालकमंत्री तथा कृषि राज्य मंत्री डॉ विश्वजित कदम यांना विचारले असता येत्या 8 दिवसात ह्या प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वसन दिले आहे. एकंदरित शासनाकड़े धान खरेदीचे वेळापत्रक दरवर्षी सारखे असते, असे असले तरी केवळ नियोजन शून्य कारभारामुळे धानाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने मात्र दरवर्षी जिल्हातील शेतकऱ्यांचे हंगामाचे वेळापत्रक चूकते आहे, त्याच्या परिणाम कमी उत्पादन पर्यायाने कर्जाबाजारी पनात होत असतो हेही तीतकेच खरे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT