बीड: बीड जिल्ह्यामध्ये महावितरणच्या गलथान कारभारामुळे, विद्युत तारेचे शॉर्टसर्किट होऊन ऊस जळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 2 महिन्यात जवळपास 200 पेक्षा जास्त घटना समोर आले आहेत. यामध्ये हजारो एकरावरील ऊस जळून खाक झाला आहे. डोळ्या देखत ऊस जळून गेल्याने अक्षरशः महिला शेतकऱ्यांने हंबरडा फोडाला आहे, तर या बेजबाबदार महावितरणच्या अधिकार्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे मूळ शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी कशी झाली?
ऊस जळून गेलाय काय करायचं आता, आम्ही या उसाला फाशी घ्यायची का? लई स्वप्न पाहिले होते. मुलीचे लग्न मुलाचे शिक्षण कस पूर्ण करायचं? हाणून घ्यावं का? भरपाई कोण देणार? याच उसाला फाशी घ्यावी का? म्हणत अक्षरशः शेतकरी महिलेने हंबरडा फोडला आहे. या महिलेचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे.
पहा व्हिडिओ-
२ दिवसापूर्वी बीडच्या धारुर तालुक्यात असणाऱ्या, आंबेवडगाव गावातील ४ शेतकऱ्यांचा तोडणीला आलेला ऊस जळून खाक झाला आहे. यात शेतकरी माणिक विनायक तिडके यांचा अडीच एकर ऊस तोडणीला आला होता. टोळी येण्याअगोदरचं महावितरणच्या तारेवरील शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे. त्यामध्ये अडीच एकर ऊस जळून खाक झाला आहे. या ऊसाच्या बिलावर लहान मुलीचे लग्न करेल, असे स्वप्न माणिकराव यांनी पाहिले होते. मे महिन्यात लग्न करायचे होते. मात्र, आता ऊस जळून खाक झाल्याने, स्वप्न पूर्ण होईल की नाही? अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
हे देखील पहा-
याच गावातील महिला शेतकरी अनिता रामधन घोळवे या शेतात काम करत असताना, त्यांच्या समोर वाऱ्यामुळे विद्युत तारेत शॉर्टसर्किट झाले, आणि ऊसाला आग लागली. आरडा- ओरड करून गावातील लोकांना गोळा करण्यात आले होते. मात्र, आग आटोक्यात येईपर्यंत संपूर्ण ऊस जळून खाक झाला. माझ्या मुलाचा नंबर एम बी बी एस ला लागला आहे. त्याची फी भरता येईल, अस वाटलं होतं पण आता मुलांच शिक्षण कस कराव? असा प्रश्न अनिता याना पडला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विद्युत वितरणच्या लोंबणाऱ्या तारा मुळे शॉर्टसर्किट झाले आणि आग लागली. आग विजवण्यासाठी गावातील लोक प्रयत्न करत होते. मात्र, तोपर्यंत ७ ते ८ एकर ऊस जळून खाक झाला आहे. या अगोदर विद्युत वितरणला तक्रार देऊन देखील त्यांनी काहीच केले नाही. असे दीपक घोळवे या शेतकऱ्याने सांगितले आहे.
विद्युत वितरणच्या बेजबाबदार धोरणामुळे नवे संकट उभ राहिल आहे. वारंवार सांगून देखील विद्युत वितरणचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. २५ ते ३० वर्षापूर्वी उभे केलेले पोल, तारा दुरुस्ती देखील केले जात नाही. एकीकडे सक्तीने वीज बिल वसुली केली जाते. मात्र, सेवा पुरवली जात नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आला आहे. त्यात अतिवृष्टीने पिकांसह जमीनी देखील वाहून गेल्या आहेत. त्यात कुठंतरी हा शेतकरी आता उभा राहण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र, महावितरणचा गलथान कारभार पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली जात आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.