बीड : सौरपंप चोर टोळीचा गेवराई पोलिसांना केला पर्दाफाश SaamTvNews
ऍग्रो वन

बीड : सौरपंप चोर टोळीचा गेवराई पोलिसांना केला पर्दाफाश

सिनेस्टाईल पाठलाग करत तिघांच्या आवळल्या मुसक्या; तर 10 लाखांचा मुद्देमाल केला जप्त...

विनोद जिरे

बीड : सौरपंप चोरणाऱ्या टोळीचा बीडच्या गेवराई पोलिसांना पर्दाफाश केलाय. सिनेस्टाईल पाठलाग करत, तिघांच्या मुसक्या आवळत तब्बल 10 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. बीडच्या (Beed) गेवराई तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकर्‍यांच्या विहिरीवर बसवण्यात आलेल्या सौर ऊर्जा पंप (Solar Water Pump) चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ झाली आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तालुक्यातील विविध ठिकाणचे गुन्हेही दाखल झालेले आहेत. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस या चोरट्यांच्या मागावर होते.

हे देखील पाहा :

यादरम्यान, पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून, कर्मचारी विठ्ठल देशमुख यांना, गेवराई परिसरात एक संशयीत सौर ऊर्जाचे साहित्य घेऊन जाणारे ट्रॅक्टर (Tractor) आढळून आल्यानंतर, त्यानी ट्रॅक्टरचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. यावेळी ट्रॅक्टर सुसाट वेगाने कच्च्या रस्त्याने निघाले असतांना, पोलिसांनी (Police) त्याचा फिल्मी स्टाईल पध्दतीने पाठलाग केला. यानंतर पोलीस पाठलाग करायचा सोडत नसल्याने, चोरट्याने ट्रॅक्टर सोडून पळ काढला.

मात्र, यात पोलिसांनी ट्रॅक्टरसह चोरीचे साहित्य व एक आरोपी ताब्यात घेतला असून यानंतर त्याच्या मोबाईल कॉल डीटेल्स वरून आणखी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी गेवराई (Georai) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, यामुळे आता जिल्ह्यातील सौरपंप चोरीच्या (Theft) घटना आणि गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT