Bogus Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Bogus Crop Insurance : बीड जिल्ह्यात बोगस पीकविमा भरणा; विमा कंपनीकडून स्पॉट तपासणी सुरू, गुन्हे दाखल करायची मागणी

Beed News : बीड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ मध्ये शासकीय जमीन, शेत दाखवून पीकविमा लुटारूंनी बोगस पीक विमा भरला होता. पुन्हा रब्बी हंगामातही असाच प्रकार उघडकीस

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात बोगस पिक विमा भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या नंतर आता (Crop Insurance) पिकविमा कंपनीकडून स्पॉट तपासणी सुरू करण्यात आली आहे. तर बोगस पीकविमा लुटारुनवर (Beed) फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. (Live Marathi News)

बीड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ मध्ये शासकीय जमीन, शेत दाखवून पीकविमा लुटारूंनी बोगस पीक विमा भरला होता. पुन्हा रब्बी हंगामातही असाच प्रकार उघडकीस आला आहे. रब्बीचे अंदाजित पेरणी क्षेत्र ३ लाख ३२ हजार ३५३ असून ३ लाख २० हजार ९४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. परंतु जिल्ह्यातील १२ लाख ३८ हजार ७२ (Farmer) शेतकऱ्यांनी ५ लाख ६७ हजार २८९ हेक्टरचा पीक विमा उतरवला आहे. म्हणजेच २ लाख ४७ हजार १९५ हेक्टरवर अतिरिक्त विमा उतरविण्यात आला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पीकविमाचा बोगस भरणा झाल्याचे समोर आल्यानंतर पीक विमा कंपनीकडून (Crop Insurance Company) पंचनामे सुरू झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र आढळून येणार नाही. त्यांचा विमा रद्द केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान केवळ पिक विमा रद्द करून चालणार नाही. तर अशा बोगस पिकविमा भरणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत; अशी मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: लग्नासाठी मुली मिळेना, २ तरुणांनी संपवलं आयुष्य; बुलडाणा हादरले

Political News : भाजप नेत्याला मोठा दिलासा, बलात्कार प्रकरणात कोर्टाकडून क्लीन चिट; नेमकं काय घडलं होतं?

World Earth Day 2026 : 22 एप्रिल हा दिवस जागतिक पृथ्वी दिन म्हणून का साजरा करतात? जाणून घ्या महत्व आणि इतिहास

Maharashtra News Live Update: टिटवाळा ड्रग्ज प्रकरणात आणखी एकाला अटक, अश्विनी पॉलच्या लिव्ह इन पार्टनरला बेड्या

४० मिनिटं विकेटकिपिंग, १ तास फलंदाजी; एमएस धोनी आयपीएलमध्ये कमबॅक करणार?

SCROLL FOR NEXT