Beed News Saam tv
ऍग्रो वन

CCI Center : सीसीआयवरील खरेदी बंद; सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसह कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

Beed News : बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सीसीआयच्या माध्यमातून जवळपास ६२ हजार क्विंटल कापूस खरेदी झाली. मात्र सीसीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आठवडाभरापासून ही खरेदी बंद

Rajesh Sonwane

बीड : कापूस खरेदीसाठी सुरु करण्यात आलेले सीसीआयची खरेदी केंद्र तांत्रिक कारणामुळे बंद पडली आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपाठोपाठ आता कापूस उत्पादक शेतकरी देखील चिंताग्रस्त झाले आहेत. बीड जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून कापूस खरेदी बंद झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना खाजगी बाजारात कापूस विकावा लागत आहे. यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. 

बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सीसीआयच्या माध्यमातून जवळपास ६२ हजार क्विंटल कापूस खरेदी झाली. मात्र सीसीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आठवडाभरापासून ही खरेदी बंद आहे. आधीच नाफेड कडून सोयाबीनची खरेदी बंद झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. यात अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून आहे. तीच परिस्थिती आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांबाबत घडत आहे. 

शेतकऱ्यांसमोर संकट 

बीड जिल्ह्यात सीसीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कापूस खरेदी बंद झाली आहे. यामुळे येथे कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना ताटकळत थांबावे लागत आहे. तर काही शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी व्यापाऱ्याला कापूस विक्री करावा लागत आहे. परिणामी आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर देखील हे संकट उभा ठाकले आहे. सीसीआय केंद्रावर खरेदी कधी सुरु होणार याची प्रतीक्षा आहे. 

गवार शेंगांचा भाव वाढला
भंडारा जिल्ह्यात धान, सोयाबीन, हरभरा, गहू, ऊस ही प्रमुख पिके असली तरी अनेक शेतकरी भाजीपाला उत्पादनाकडे वळले आहेत. त्यात कमी पाण्यात व हलक्या जमिनीत येणाऱ्या गवार पिकाला पसंती दिली जात आहे. जिल्ह्यातील शेती प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून असली तरी करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. बाजारपेठेत कोणत्या पिकाला मागणी आहे, ही बाब लक्षात घेऊन पिकांची निवड केली जात आहे. प्रत्येकजण आरोग्य जपण्याचा प्रयत्न करीत असून भाजीपालाही दररोजच्या आहारात पाहावयास मिळत आहे. शेवग्याच्या शेंगांत असलेले पौष्टिक घटक पाहता या शेंगांना बाजारात चांगली मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला धडक दिल्यानंतर...; २२ विद्यार्थी जखमी

Maharashtra Live News Update: दहिसर टोल नाका शिफ्ट करण्याचा सरकारचा निर्णय - प्रताप सरनाईक

Indurikar Maharaj Age: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज याचं वय किती? माहितीये का?

DNAचे जनक शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचं निधन; ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gold Price Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८- २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT