Beed News Saam tv
ऍग्रो वन

Beed News : धक्कादायक..बीड जिल्ह्यात ११ महिन्यात २५४ शेतकऱ्यांनी संपवले जीवन; अतिवृष्टी, नापिकी ठरतेय कारण

Beed News : अवकाळीची मदत असो हे शेतकऱ्यांच्या पदरी पाहिजे तेवढी पडत नाही. त्यात उरल्या सुरल्या आलेल्या पिकांना भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक विंवचनेत असतो. यातून टोकाचे पाऊल उचलत आहे

विनोद जिरे

बीड : कर्जबाजारीपणा, नापिकी यातून शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या घटना नेहमीच (Beed) घडत आहेत. परंतु राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात शेतकरी (Farmer) आत्महत्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. बीड जिल्ह्यात मागील ११ महिन्यात तब्बल २५४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. (Tajya Batmya)

बीड जिल्ह्यात गतवर्षी अतिवृष्टी झाली, तर यंदा दुष्काळ पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली. यात आताच्या अवकाळी पावसामुळे (Rain) देखील शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या शिवाय आजही अनेकांना पिक विमा मिळालेला नाही. दुष्काळी अनुदान असो की अवकाळीची मदत असो हे शेतकऱ्यांच्या पदरी पाहिजे तेवढी पडत नाही. त्यात उरल्या सुरल्या आलेल्या पिकांना भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक विंवचनेत असतो. यातून टोकाचे पाऊल उचलत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बीड जिल्ह्यातील शेतकरी हा आर्थिक संकटात सापडल्याने नैराश्यात जीवन जगत आहे. यामुळे जगावं कसं? असा प्रश्न समोर असल्याने शेतकऱ्यांचे आत्महत्येचे सत्र वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मायबाप सरकार शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी उपाययोजना करणार का? आणि शेतकऱ्यांना आधार देणार का? हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, गोळीबारानंतर आरोपी लीलावती रुग्णालयात गेलेला

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT