Beed
Beed  विनोद जिरे
ऍग्रो वन

बीड जिल्ह्यात ज्वारीपेक्षा कडबा यंदा खातोय भाव

विनोद जिरे

बीड: बीड जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने, शेतकर्‍यांनी (farmers) नगदी पिकाकडे मोर्चा वळवत ज्वारी पिकाकडे कानाडोळा केला जात आहे. कडब्याच्या (kadaba ) भावात गेल्या तीन दिवसात 5 हजार रुपये शेकडा भाव झाला आहे. अवकाळी पावसाचा (rain) फटका व चाऱ्याला मागणी वाढल्याने हा बदल झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

हे देखील पहा-

त्यामुळे यंदा ज्वारीचे क्षेत्र घटल्याने, जनावरांसाठी वाळलेला चारा असलेल्या वैरणीला तब्बल 5 हजार रुपये शेकडा भाव आला आहे. दुधाळ जनावरांसाठी सुका चारा (Fodder) म्हणून वैरणीचा वापर केला जातो. त्यामुळे दुधाचे प्रमाण देखील वाढत आहे. जनावराचे (animals) आरोग्य देखील व्यवस्थित राहते, म्हणून वैरण हा चारा महत्त्वाचा आहे.

यातच वैरणीचा चाऱ्याचे भाव वाढल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. बीडच्या अंबिल वडगाव गावातील (village) अक्षय कापसे त्याच्याकडे दूधदुती 5 जनावरे आहेत. या जनावरांना ओल्या चाऱ्यासोबत सुका चारा म्हणून वैरणीचा वापर केला जातो. मात्र, यावर्षी वैरणीचे क्षेत्र घटल्यामुळे, 4 हजार ते साडेचार हजार भाव झाले असल्याचे अक्षय कापसे यांनी सांगितले आहे. तसेच जनावरांच्या आरोग्यासाठी (health) पोलाद चाऱ्याबरोबर सुका चारा महत्त्वाचा आहे. असे देखील ते म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: प्रफुल्ल पटेलांना जिरेटोप भोवला, टीकेची झोड उठल्यानंतर पटेलांची माघार

Suzuki Jimny चा नवीन 5 डोअर एडिशन लॉन्च, मिळत आहे 1.50 लाखांपर्यंत सूट

Lok Sabha Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार भव्य प्रचारसभा?

Khatron Ke Khiladi 14: 'खतरों के खिलाडी १४'मध्ये कोण- कोण सेलिब्रिटी दिसणार? पाहा लिस्ट...

Health Tips: लोखंडाच्या कढईमध्ये चुकूनही बनवू नका हे पदार्थ, नाहीतर...

SCROLL FOR NEXT