बीड पीक विमा पॅटर्नचा बोगसपणा चव्हाट्यावर? विनोद जिरे
ऍग्रो वन

बीड पीक विमा पॅटर्नचा बोगसपणा चव्हाट्यावर?

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शेतकरी मुक्कामी...

विनोद जिरे

बीड - राज्य सरकारमधील मंत्र्यांनी मोठा गाजावाजा करत, बीड पिक विमा पॅटर्नचा गवगवा केला. मात्र याच बीड पीक विमा पॅटर्नचा एक प्रकारचा बोगस पणा, बीड जिल्ह्यात चव्हाट्यावर आला आहे. दिवाळीच्या सणासुदीत आमची दिवाळी गोड करा, आमच्या हक्काचा पिक विमा आम्हाला द्या. ही मागणी घेऊन, शेकडो शेतकऱ्यांना शासनाच्या दारात, रस्त्यावर झोपून दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे.

बीडमध्ये किसान सभेच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांनी, परळी तालुक्यातील सिरसाळा ते बीड पायी लॉंच मार्च काढला होता. गेल्या चार दिवसापूर्वी काढलेला लॉंग मार्च काल बीडमध्ये पोहोचला. यावेळी 2020 चा पीकविमा मिळावा, ही प्रमुख मागणी घेऊन इतर मागण्यासाठी, शेतकऱ्यांनी ठिय्या सुरू केला. मात्र कालचा दिवाळीचा पहिला दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या दिला.

हे देखील पहा -

यावेळी चालू पीक विमा देऊ असं प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मान्य केलं. मात्र 2020 चा पिकविम्यावर तोडगा काढला नाही. त्यामुळं संतप्त शेतकऱ्यांनी दिवसभर ठिय्या दिल्यानंतर, रात्री झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी जागरण गोंधळ आंदोलन करत, शेकडो शेतकरी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक्कामी राहिले.

याविषयी आंदोलनकर्ते वृद्ध शेतकरी सातेराम शिरसाठ म्हणाले, की मला अडीच एकर जमीन आहे. यामध्ये घेतलेल्या पिकांचा विमा उतरविला आहे. मात्र विमा उतरून देखील शासनाने आणि विमा कंपनीने आमची फसगत लावली आहे. ते सांगतात की आम्ही विमा मंजूर केला आहे. मात्र प्रत्यक्ष पाहिला तर कुठेच ताळमेळ लागत नाही. "हे सगळं मटका खेळण्यासारखं शेतकऱ्यांना वेड्यात काढत आहेत." यामुळे आम्ही गेल्या तीन दिवसांपासून पायी चालून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहोत. दुपारपासून या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहोत. मात्र आम्हा शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाहीत.

'आज मी एकटाच शेतकरी नसून, माझ्यासारखे हजारो शेतकरी आंदोलनात आहेत. आज त्यांच्या संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु या पीक विमा कंपन्यांना शासन पाठीशी घालत आहे. केवळ शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम यांनी केलं आहे. त्यामुळे दिवाळी दिवशी देखील शासनाच्या दारात आम्ही रात्र काढत आहोत. तीन दिवस चालून आमच्या पायाला फोड आलेत. मात्र याचं शासनाला काहीच देणं घेणं नाही. आज शेतकऱ्यांचे बेहाल आहेत, त्यामुळे आम्ही आता, जोपर्यंत पिक विमा मिळत नाही, तोपर्यंत उठणार नाहीत. असा इशारा वृद्ध शेतकरी सातेराम शिरसाठ यांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anagha Atul: भरपावसात साडी नेसून अनघा अतुलचं बोल्ड फोटोशूट, Photos

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

Pune PMC News : पुण्यातील नामांकित 'जोशी' पुलावर घाणीचे साम्राज्य, महापालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

Healthy liver color: निरोगी लिव्हरचा रंग कसा असतो?

Mumbai Rain: मुंबईत कोसळधार! चेंबूरमध्ये पालिका रुग्णालयाबाहेर ४ फुटांपर्यंत पाणी, रुग्णांना खांद्यावरून नेण्याची वेळ; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT