Pandharpur Bajar Samiti saam tv
ऍग्रो वन

Bedana Issue : पंढरपूर बाजार समितीत बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लूट? व्यापा-यांवर संशय

भारत नागणे

Pandharpur News : बेदाणा सॅम्पलच्या नावाखाली पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित व्यापाऱ्यांवर पणन विभागाने कारवाई करावी अशी मागणी जाेर धरु लागली आहे. (Maharashtra News)

येथील बाजार समितीमध्ये कोट्यावधी रुपयांच्या बेदाण्याची आर्थिक उलाढाल होते. शनिवारी आणि मंगळवारी असे दोन दिवस येथे बेदाण्याचे सौदे होतात. बेदाणा खरेदी-विक्रीच्या वेळी संबंधित व्यापा-यांकडून सॅम्पलच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर बेदाण्याची उधळपट्टी केली जात आहे असा आराेप हाेऊ लागला आहे.

सुमारे १५ किलो बॉक्स मधील जवळपास ३ ते ४ किलो बेदाणा हा सॅम्पलच्या नावाखाली काढला जातो. प्रत्येक व्यापाऱ्याच्या आडतीला १५० ते 200 किलो बेदाणा उधळला जातो. याचा फटाका शेतकर्यांना बसत आहे. बेदाण्याची ही उधळपट्टी थांबवण्याची मागणी होत आहे.

व्यापा-यांच्या या उधळपट्टीमुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्याचे पाचशे ते सहाशे रुपयांचे नुकसान होत आहे. आधीच शेतीमालाला बाजारभाव‌ नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यात आता व्यापा-याकडून शेतक-यांची अशा पध्दतीने लुटमार केली जात आहे.

बेदाणा लुटमारीचा हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहे. याकडे बाजार समितीचे ही दुर्लक्ष होत असल्याने न्याय कोणाकडे मागायाचा असा उद्विग्न सवाल शेतकरी करु लागले आहेत.

येथील उधळपट्टीचा प्रकाराबाबत पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कानावर काही शेतक-यांनी मध्यंतरी घातला होता. त्यावेळी त्यांनी संबंधित व्यापारी आणि बाजार समिती कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मंत्र्यांच्या कारवाईच्या आश्वासनानंतरही पंढरपुरात बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरूच आहे असे शेतक-यांचे म्हणणे आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे 'विराट' आघाडी; न्यूझीलंडची ३५६ धावांनी सरशी, रोहितसेना पिछाडीवर!

Viral Video: लोकलच्या गर्दीत अंताक्षरीचा खेळ! टाळ, तबल्यासोबत जोरदार मैफिल रंगली; सुंदर VIDEO एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT