Baramati Farmer Saam tv
ऍग्रो वन

Baramati Farmer : मांडकी येथे शेतकऱ्यांनी घेतले उसाचे विक्रमी उत्पादन; एक एकरात १२० टन उस

Baramati News : बारामती जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील ऊस शेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या मांडकी गावामध्ये पूर्वीपासूनच उसाचे उत्पादन घेतलं जाते. यामुळे येथील शेतकऱ्यांना ऊस उत्पादन घेण्याचा अनुभव आहे.

मंगेश कचरे

बारामती : पुरंदर तालुक्यातील मांडकी येथील ऊस बागायतदार शेतकऱ्यांनी एकरी शंभर टनापेक्षा जास्त म्हणजे जवळपास १२० टन एकरी उत्पादन घेण्याचा विक्रम केला आहे. ऊस लागवड करताना नवीन पद्धतीचा अवलंब करत शेतकऱ्यांनी हा यशस्वी प्रयोग केला आहे. तर उत्पादित झालेल्या ऊस ३० ते ४० पेरांचा आला आहे. 

बारामती जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील ऊस शेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या मांडकी गावामध्ये पूर्वीपासूनच चांगल्या पद्धतीने उसाचे उत्पादन घेतलं जाते. यामुळे येथील शेतकऱ्यांना ऊस उत्पादन घेण्याचा अनुभव आहे. यामुळे उसाचे उत्पादन घेताना नवनवीन प्रयोग देखील करत असतात. अशाच प्रकारे नवीन प्रयोग करत मांडकी गावातील शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेण्यात यश मिळविले आहे. 

दरम्यान पाठीमागील काळात ८० ते ९० टन एकरी उत्पादन या गावात घेतले जात होते. मात्र आता नवीन पद्धतीचा वापर करून म्हणजेच रोप लागवड, साडेचार फुटाची सरी, ठिबक सिंचनद्वारे पाणी आणि द्रव खतांचा वापर ड्रिंचींग आणि शेती तज्ञांचा सल्ला या माध्यमातून या शेतकऱ्यांनी एकरी १२० टनापर्यंतचा टप्पा गाठला आहे.

बदलत्या वातावरणाचा ऊस पिकाला फटका

वातावरण बदलाचा फटका ऊस पिकाला बसला असून उसाला तुरे आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ऊसाला तुरे आल्याने ऊस आतून पोकळ होऊन वजन कमी होत असते. परिणामी शेतकऱ्यांचे यामध्ये आर्थिक नुकसान होणार आहे. सर्वसाधारणतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ऊसाला तुरे येतात. मात्र यावर्षी बदलत्या हवामानामुळे लवकरच उसाला तुरे आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार मेधा कुलकर्णी इलेक्ट्रिक वाहनाने विधान भवनात दाखल

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT