Soybean Price Saam tv
ऍग्रो वन

Soybean Price : सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण; सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात

Amravati News : सोयाबीनचे दर वाढतील यापेक्षाने काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली नाही व ते विकन्या ऐवजी साठवून ठेवले.

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: सोयाबीनला चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी करत घरात साठवणूक (Amravati) करून ठेवली. परंतु दारात वाढ न होता मागील डिड महिन्यापासून सातत्याने घसरण होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे (Soyabean) सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. (Live Marathi News)

मागील वर्षी सोयाबीला पाच ते सहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी (Farmer) यावर्षी सोयाबीनला कमी भाव असल्याने सोयाबीनची साठवणूक करून ठेवली. मात्र मागील दीड महिन्यापासून सातत्याने (Soybean Price) सोयाबीनचे दर घट असून ते आता ४ हजार ४५० ते ४ हजार ५३६ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहे. सोयाबीनचे दर वाढतील यापेक्षाने काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली नाही व ते विकन्या ऐवजी साठवून ठेवले. मात्र आता सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दर वाढीची अपेक्षा नाहीच 

सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आता कमी होत चालली आहे. सोयाबीनचा हंगाम आता संपला असून भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्याने घरात साठवणूक करून ठेवली आहे. परंतु भाव वाढ होत नसल्याने आता त्याच भावात विक्री करावी लागणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT