Agriculture News Saam tv
ऍग्रो वन

Agriculture News : हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव, चार एकर क्षेत्रावर फिरविला रोटाव्हेटर

Amravati News : एक महिन्यांपूर्वी त्यांच्या चार एकर शेतामध्ये हरभऱ्याची लागवड केली होती. पेरणी केल्यानंतर पाऊस नसल्यामुळे त्यांनी बोरिंगच्या साह्याने हरभऱ्याला पाणी दिले

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: अवकाळी पाऊस यानंतर ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर रोग पडला. यात चार एकर क्षेत्रात लागवड (Amravati) केलेल्या हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे हरभरा पिकाची वाढ खुंटली. यामुळे शेतकऱ्याने (Farmer) नाइलाजात्सव चार एकरांवरील हरभऱ्यावर ट्रॅक्टर फिरवत रोटाव्हेटर केले.  (Maharashtra News)

अमरावती जिल्ह्यतील दर्यापूर तालुक्यात जीतापुर भाबोरा येथील शेतकरी मनोहर नथुजी काळे यांनी मागील एक महिन्यांपूर्वी त्यांच्या चार एकर शेतामध्ये हरभऱ्याची लागवड केली होती. पेरणी केल्यानंतर पाऊस नसल्यामुळे त्यांनी बोरिंगच्या साह्याने हरभऱ्याला पाणी दिले. नंतर अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे चारही एकर शेतात हरभऱ्यावर मोठ्या प्रमाणात मर रोग आल्याने शेतकरी चिंतेत पडलेला होता. काही केल्या मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊन पिकात सुधारणा होत नव्हती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

६० हजारापर्यंत खर्च 

हरभऱ्यात सुधारणा होत नसल्याने अखेर शेतकरी मनोहर काळे यांनी उभ्या हरभऱ्याच्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला. यामध्ये त्यांना पेरणीपासून तर लागवडी पर्यंत ५० ते ६० हजार रुपये अंदाजे खर्च लागला असून शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी; अशी मागणी शेतकरी मनोहर काळे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT