Amravati News Saam tv
ऍग्रो वन

Amravati News : सोयाबीनची शासकीय खरेदी चार दिवसातच थांबली; अमरावती जिल्ह्यात अजूनही ४ लाख क्विंटल सोयाबीन पडून

Amravati News : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ५ हजार रुपये दर अपेक्षित असताना सोयाबीनचे दर ४ हजार ३०० रुपये प्रती क्विंटलवर येऊन पडले आहे.

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिना सुरू होताच सोयाबीनच्या दरात प्रचंड घट झाली. शासकीय हमीभावाने (Soyabean) सोयाबीनची खरेदी करण्यासाठी शासकीय खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. मात्र (Amravati) अमरावतीमध्ये सुरु करण्यात आलेले हे केंद्र ४- ५ दिवस सुरु राहिल्यानंतर बंद झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीला अडचण निर्माण झाली आहे. (Tajya Batmya)

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ५ हजार रुपये दर अपेक्षित असताना सोयाबीनचे दर ४ हजार ३०० रुपये प्रती क्विंटलवर येऊन पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे (Farmer) साधारणतः चार ते पाच लाख क्विंटल सोयाबीन विक्रीविनाच पडून असल्याने शासनाच्या हमीभावाप्रमाणे (Soyabean Price) सोयाबीनची शासकीय खरेदी जिल्ह्यात सुरू झाली. शासकीय खरेदीमध्ये सोयाबीनला ४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत होता. मात्र केवळ चार ते पाच दिवसाचा ही शासकीय खरेदी बंद पडली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

३ हजार ३०० क्विंटल सोयाबीनची खरेदी 

या चार दिवसात शासकीय खरेदी केंद्रावर ३ हजार ३४९ क्विंटल एवढ्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करण्यात आली. त्यामुळे आता हे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्याने याचा आर्थिक फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भरत आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ शासकीय खरे सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

इराणकडून अमेरिकेची आर्थिक नाकेबंदी, तेल व्यापार चीनचे चलन युआनमध्ये करणार?

SCROLL FOR NEXT