Water Scarcity
Water ScarcitySaam tv

Water Scarcity : बीड, नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट; नंदुरबारच्या १९५ गावे, २२१ पाड्यांमध्ये पाणीटंचाई

Beed Nandurbar News : जिल्ह्यातील १९५ गावे आणि २२१ पाड्यांमध्ये पाणीटंचाईच्या सामना करावा लागणार आहे. तर बीड, माजलगाव शहरासह अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणात अवघा ४ टक्केच पाणीसाठी राहिला आहे
Published on

सागर निकवाडे/विनोद जिरे 

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दोन तालुक्यांत पूर्ण तर इतर तालुक्यातील (Nandurbar) मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. यंदा जिल्ह्यातील १९५ गावे आणि २२१ पाड्यांमध्ये पाणीटंचाईच्या सामना करावा लागणार आहे. तर (Beed) बीड, माजलगाव शहरासह अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणात अवघा ४ टक्केच पाणीसाठी राहिला आहे. (Latest Marathi News)

Water Scarcity
Sambhajinagar Crime: लग्नाचं आमिष दाखवून २ परिचारिकांचं अपहरण; एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नंदुरबार जिल्ह्यातील गावपाड्यांसह इतर भागांतील लघु आणि मध्यम प्रकल्पात भूजल पातळी कमी होत आहे. यामुळे येत्या काळात पाणीटंचाईत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात भूजल पातळी ही साडेपाच फुटांपर्यंत खोल गेली आहे. भूजल खोल जातानाच सहा मध्यम, दोन बॅरेज आणि १२ लघु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा कमी झाला आहे. (Water Scarcity) या साठ्यावर अवलंबून असलेल्या शहरी आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांना पाणी कपातीचे धोरण आतापासूनच स्वीकारावे लागले आहे. तर यंदा जून २०२४ पर्यंत पाणीटंचाई राहणार असल्याने शासनाकडून कधी उपयोजना सुरू करण्यात येतील हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Water Scarcity
Rohit Pawar News: राज ठाकरे आमच्याबरोबर आले तर त्यांचे स्वागतच: आमदार रोहित पवार

बीडच्या माजलगाव धरणात ४ टक्केच पाणीसाठा 
बीड : बीड, माजलगाव शहरासह अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या (Majalgaon) माजलगाव धरणात केवळ ४ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा बीड व माजलगाव शहरासह अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. धरण मागील ३-४ वर्षांत दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे पाण्याची कमतरता नव्हती. मात्र यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे हिवाळ्यातचं जलसाठे आटले आहेत. त्यामुळे पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागणार आहेत.

Water Scarcity
Saam Impact : शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या व्यापाऱ्यांना दणका; केंद्रावर लिलाव करण्यास बंदी

विशेष म्हणजे धरण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच ४ टक्क्यांवर आले आहे. यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असून उन्हाळी पिकेही घेता येणार नाहीत. सध्या धरणाची पाणीपातळी ४२६.४७ मीटर एवढी आहे. धरणाचा जिवंत पाणीसाठा केवळ १२.८० दलघमी एवढाच शिल्लक आहे. १५ ते २० फेब्रुवारीपर्यंत धरणाचा पाणीसाठा जोत्याखाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्यात बीड व माजलगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याअखेर अनेक गावांत पाण्यासाठी टँकरची सोय करावी लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com